शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफर, दिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 15:25 IST

खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपीआय पक्षात याव. हे दोन दिग्गज नेते आमच्या पक्षात आले तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देउदयनराजे, नारायण राणेंना आठवेलेंची आॅफरदिग्गज दोन नेत्यांमुळे आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल

सातारा : खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपीआय पक्षात याव. हे दोन दिग्गज नेते आमच्या पक्षात आले तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.येथील सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले हे राजघराण्याचे आहेत. त्यांना माननारा वर्ग मोठा आहे. ते आमच्या पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे. राष्ट्रवादीने आगीमी निवडणुकीमध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं नाही तर आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना तिकीट दिलं जाईल.

लोकसभेला माझी आणि उदयनराजेंची या दोन जागा निवडून आल्या तर आरपीआय पक्षाला सिम्बॉल मिळेल. उदयनराजे ज्यावेळी मला भेटले तेंव्हा मी त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. शेवटी त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट करून नारायण राणेंनाही आठवलेंनी पक्षात येण्याची आॅफर दिली.मंत्री आठवले म्हणाले, राज्यसभेसाठी नारायण राणेंची धडपड सुरू आहे. मात्र, इथे नेमके काय होईल, ते आत्ता सांगता येणार नाही. त्यांनीही आरपीआय पक्षात यावं. या पक्षामध्ये सर्वांना सामावून घेतलं जातं. केवळ दलितांचाच हा पक्ष आहे, असे नव्हे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNarayan Raneनारायण राणे Satara areaसातारा परिसर