भाजपकडून काही मिळत नसेल राणेंनी आरपीआयमध्ये यावे, आठवलेंची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 01:29 PM2018-03-02T13:29:55+5:302018-03-02T13:29:55+5:30

माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे.

Ranee should not get anything from the BJP, the eighth offer will come in the RPI | भाजपकडून काही मिळत नसेल राणेंनी आरपीआयमध्ये यावे, आठवलेंची ऑफर

भाजपकडून काही मिळत नसेल राणेंनी आरपीआयमध्ये यावे, आठवलेंची ऑफर

Next

पिंपरी :  माजी मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे. अशी ऑफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल. 
2019 मध्ये भाजपाच्या काही जागा घटतील,पण 250 पेक्षा कमी होणार नाहीत. एन डी ए सत्तेत राहील, असे भाकीत त्यांनी केले.शिवसेना भाजपा स्वतंत्र लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यास आपण स्वतः पुढाकार घेणार आहे,
तरुणांनी स्वयं रोजगाकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. 

2019मध्ये होणाऱ्या निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी आज एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आगामी निवडणूकीत भाजपाच्या जागा कमी होतील पण 250 जागांच्या जोरावर भाजपा पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करतील.  भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला यावेळी आठवलेंनी दिला. मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, मी सत्तेत असलो तरी माझ्याकडे गृहखातं नाही.  मात्र यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे. 

 

Web Title: Ranee should not get anything from the BJP, the eighth offer will come in the RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.