शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

"उदयनराजेंच्या अफाट बुद्धीचा आविष्कार पोटनिवडणुकीत पाहिला", शिवेंद्रसिंहराजेंचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:09 IST

सातारा : उदयनराजेंच्या अफाट आणि अचाट बुद्धीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लोकसभा मतदारसंघात खासदार असताना चार महिन्यांत राजीनामा ...

सातारा : उदयनराजेंच्या अफाट आणि अचाट बुद्धीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. लोकसभा मतदारसंघात खासदार असताना चार महिन्यांत राजीनामा देणाऱ्या उदयनराजेंच्या बुद्धीचा आविष्कार आणि पराक्रम जनतेने बघितला आहे. तसेच सातारा जावळी तालुक्यांमध्ये ज्यांना ताकद आजमावायची आहे त्यांनी आजमावावी, असे प्रति आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांना देखील दिले.आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंनी माझ्यावर बुद्धीची वाढ झाली नाही, असा आरोप केला आहे. मात्र लोकसभेची पोटनिवडणूक त्यांच्या बुद्धीच्या आविष्कारामुळे लागली. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडून आले होते आणि चार महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा हातातून घालवून बसले आणि राज्यसभेला मागच्या दाराने जावे लागले. हा तर त्यांचा पराक्रम समजून आला आहे.

सातारा विकास आघाडीने साडेचार वर्षे नगरपालिका लुटून खायचा एकमेव कार्यक्रम केला आहे. पैसे काढण्यासाठी त्यांची अफाट बुद्धी वापरात आली. सातारच्या जनतेने पाच वर्षे सातत्यपूर्ण विकास व्हावा की चार महिन्यांच्या डायलॉगबाजीला महत्त्व द्यावे हे एकदाच ठरवून घ्यावे.नगरपालिकेची निवडणूक आली की उदयनराजे आणि त्यांचे बगलबच्चे जुने रेकॉर्डिंग सुरू करतात. अजिंक्यतारा बँक ही बुडलेली नाही तरीही चुकीची माहिती पसरवली जाते. बँकेच्या एकाही सभासदाचे नुकसान होऊ दिले नाही. कर्मचाऱ्यांचे नुकसान झालेले नाही, जे ठेवीदार होते त्यांना बँक मर्ज झाल्याने सगळे पैसे परत मिळाले आहेत.

मात्र जिल्हा बँकेची निवडणूक लागली असताना स्वार्थ लक्षात घेऊन संचालक होण्यासाठी दिवाळीचे डबे घेऊन नेत्यांचे उंबरे उदयनराजेंनी झिजवले आहेत, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केलीमाझ्यावर कुठलाही घरफोडीचा गुन्हा नाही...घरफोड्या केल्याचा आरोप उदयनराजेंनी केला होता, त्याबाबत विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी कुणाचे घर फोडले हे त्यांनी दाखवून द्यावे. माझ्यावर कुठेही घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत २० वर्षे उदयनराजे यांच्याकडे होती; मग त्या काळात शाहूपुरीला ते पाणी का देऊ शकले नाहीत? उलट सातारा शहराची हद्दवाढ उदयनराजेंच्या बगलबच्चांनी थांबवून ठेवली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले