शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

कुचीजवळील अपघातात जयसिंगपूरच्या दोन महिला ठार

By admin | Updated: September 25, 2016 00:50 IST

तिघेजण गंभीर : मुलगी पाहून परतताना अपघात

कवठेमहांकाळ : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या दोघी सख्ख्या मावस बहिणींचा जीप-कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात मिरज-पंढरपूर मार्गावर शनिवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला. जयसिंगपूर येथील रहिवासी असलेल्या शांताबाई अशोक बनसोडे (वय ४0) व लक्ष्मी बबन कांबळे (४५) या दोन महिला या अपघातात जागीच ठार झाल्या. अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली आहे. कांबळे व बनसोडे कुटुंबातील काहीजण ढालगावला मुलगी पाहण्यासाठी गेले होते. मुलगी पाहून जयसिंगपूरकडे परतत असताना मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुचीजवळील महाराजा पॅलेस हॉटेलसमोर त्यांची कार (एमएच 0९ एबी ८८४२) आली असता, मिरजेहून सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने (एमएच १३ ए ५९३३) त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये शांताबाई बनसोडे, लक्ष्मी कांबळे या दोन सख्ख्या मावस बहिणींचा जागीच मृत्यू झाला, अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)