शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच, रात्रीत तीन दुचाकी चोरीस: पोलिसांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:27 IST

सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूचरात्रीत तीन दुचाकी चोरीस: पोलिसांपुढे आव्हान

सातारा: शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन धारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंगळवार पेठेतील गणेश प्रमोद हेंद्रे (वय २८) यांची मंगळवारी मध्यरात्री मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

त्यांच्या गाडीची किंमत सुमारे दहा हजार रुपये होती. हिरापूर, ता. सातारा येथून सोमनाथ अंकुश अडागळे (रा. परळी, ता. सातारा) यांचीही दुचाकी (क्र. एमएच ११ सी.एस. ३७३१) चोरट्यांनी लंपास केली. त्यांच्या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये होती. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.दरम्यान, येथील यादोगोपाळ पेठेतील सारंग माने (वय ३०) यांचीही दुचाकी मंगळवारी मध्यरात्री चोरीस गेली. एकाच रात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाळत ठेवून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर