बावधन येथून दुचाकी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST2021-01-17T04:34:16+5:302021-01-17T04:34:16+5:30

वाई : बावधन येथील घराशेजारील शेडमध्ये लावलेली दुचाकी चोरीस गेली आहे. याप्रकरणी आबा मल्हारी खरात यांनी वाई पोलीस ...

Two-wheeler stolen from Bawadhan | बावधन येथून दुचाकी चोरीस

बावधन येथून दुचाकी चोरीस

वाई : बावधन येथील घराशेजारील शेडमध्ये लावलेली दुचाकी चोरीस गेली आहे. याप्रकरणी आबा मल्हारी खरात यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आबा खरात यांच्या मालकीची २५ हजार किमतीची दुचाकी (एमएच ११ बीबी ५५४७) गाडी शुक्रवार, दि. ८ रोजी रात्री अकरा वाजता घराशेजारील शेडमध्ये लावली होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी शनिवार, दि. ९ रोजी सकाळी साडेसहाला पाहिले असता गाडी शेडमध्ये दिसली नाही. म्हणून परिसरात चौकशी करून शोधाशोध केली असता गाडी आढळून आली नाही. रात्री अकरा ते पहाटे साडेसहाच्या सुमारास गाडी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. शोधूनही न सापडल्याने वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Web Title: Two-wheeler stolen from Bawadhan