शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 16:48 IST

Crimenews police satara- अवैधरीत्या गांजाविक्रीसाठी नेत असताना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी अपशिंगे (मि.) हद्दीत बोरगाव पोलिसांनी केली. संशयितांकडून १६,५०० रुपये किमतीच्या चार किलो गांजासह एक दुचाकी व मोबाईल्स असा सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ठळक मुद्देगांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना पकडले बोरगाव पोलिसांची कारवाई; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा / नागठाणे : अवैधरीत्या गांजाविक्रीसाठी नेत असताना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी अपशिंगे (मि.) हद्दीत बोरगाव पोलिसांनी केली. संशयितांकडून १६,५०० रुपये किमतीच्या चार किलो गांजासह एक दुचाकी व मोबाईल्स असा सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या प्रकरणी बाळू हणमंत चव्हाण (वय ४३, रा. सातारा रोड, ता. कोरेगाव), नाना महादेव मसगुडे (५०, रा. अपशिंगे (मि.), ता. सातारा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे.याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अपशिंगे (मिल्ट्री) गावाच्या हद्दीतून दोघेजण चोरून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना गुरुवारी (दि. ७) मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर जाणाऱ्या रस्त्यालगत वाघजाई मंदिराजवळ सापळा रचला.

यावेळी एका दुचाकीवरून दोन व्यक्ती तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांना या दोघांजवळ एक प्लास्टिकचे पोते आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या पोत्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बाळू हणमंत चव्हाण व नाना महादेव मसुगडे असल्याचे सांगून हा गांजा सातारा येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार किलो वजनाचा गांजा, एक दुचाकी व तीन मोबाईल्स असा ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत या दोघांना रात्री उशिरा अटक केली.

कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, स्वप्निल माने, विजय साळुंखे, राहुल भोये, विशाल जाधव, सातारा येथील अप्पर तहसीलदार सोपान टोपे यांनी कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस