शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा तालुक्यातील दोन शाळांमध्ये चोरी, अज्ञाताने सिलिंडर नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:22 IST

सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये चोरी करून अज्ञाताने सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. दरम्यान, या चोरीत कटावणीचा वापर करण्यात आला असून सिलिंडर नेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील साहित्य नेण्यासाठी तांदळाच्या पोत्याचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

ठळक मुद्देसातारा तालुक्यातील दोन शाळांमध्ये चोरीअज्ञाताने सिलिंडर नेले तांदूळ पोत्याचा वापर चोरीतील साहित्य नेण्यासाठी

पेट्री : सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये चोरी करून अज्ञाताने सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली.

दरम्यान, या चोरीत कटावणीचा वापर करण्यात आला असून सिलिंडर नेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील साहित्य नेण्यासाठी तांदळाच्या पोत्याचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.पेटेश्वरनगर येथील विद्यालयाची शाळा सकाळी होती. त्यामुळे शिपायाने सकाळी शाळेचे गेट उघडल्यावर कटावणी सापडली. त्यानंतर शाळेच्या खोल्या, किचनशेड उघडे दिसून आले. शाळेत चोरी झाल्याचे शिपायाच्या लक्षात आले. त्यामुळे शिपायाने हा प्रकार नागरिक, मुख्याध्यापकांना सांगितला.

पेट्री बंगला प्राथमिक केंद्रशाळेच्या पाठीमागील बाजुस असणारे आहार शिजवून देण्याचे किचनशेड फोडण्यात आले. तेथून एक गॅस सिलिंडर तसेच साधारण ३५ ताटे चोरून नेण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक प्रल्हाद पार्टे यांनी दिली. तसेच या शाळेच्या जवळ असणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयाचे किचन शेड फोडून दोन गॅस सिलिंडर तसेच इर्न्व्हटरची बॅटरी चोरून नेण्यात आली.

शाळेच्या प्रयोगशाळेच्या खोलीसह अन्य तीन खोल्यांचे कुलुप कटावणीच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठीचा पोषण आहार असणाऱ्या खोलीत अस्ताव्यस्तपणा करून काही पोती रिकामे करून बाजुला तांदूळ टाकण्यात आला आहे.

त्या पोत्याचा वापर चोरलेले साहित्य नेण्यासाठी केला असावा, अशी शक्यता मुख्याध्यापक हणमंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, चोरट्यांनी वापर केलेली कटावणी शालेय आवारात सापडली आहे. चोरीच्या या घटनेची माहिती मुख्याध्यापकांनी सातारा तालुका पोलिसांना दिली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrimeगुन्हा