सातारा : वाठार बुद्रुक येथे मंगेश पोमण याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या खुनात अटक केलेल्या आरोपीकडून गावठी बनावटीची दोन पिस्टल तसेच एक जिवंत राऊंड व मोटारसायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ८ रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावचे हद्दीतील नीरा उजवा कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यावरून लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. विकासातच मृतदेहाची ओळख पटली. तपासामध्ये मंगेश सुरेंद्र पोमण (वय ३५, रा. पोमणनगर पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा अनोळखींनी खून करून त्याचा मृतदेह फेकून दिला.
लोणंद पोलिसांनी चोवीस तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्यातील आरोपी वैभव सुभाष जगताप रा. पांगारे, ता. पुरंदर याला अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील मुख्य कुख्यात गुंड, तडीपार आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे, रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे.
यालाही नाशिकमधून स्थानिक पोलिसाचे मदतीने अटक करण्यात यश आले.
पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली असता तो पुणे येथून तडीपार असून त्याच्याकडून कुडजे, पुणे येथून खुनाचे गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक जिवंत राऊंड व मोटारसायकल सापडली. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, संतोष नाळे यांनी ही कारवाई केली.