शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदान, वाई तालुक्यातील बावधन येथील पक्षीमित्रांनी सोडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 11:56 IST

वाई : लहान मुलांमध्ये पतंग खेळण्याची मोठी हौस असते. यामुळे काही काळ मुलांचा खेळ होतोही पण हाच खेळ कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या जीवावर बेततो. असंख्य पक्षी मांज्यामध्ये अडकल्याने मृत्यूमुखी पडतात. त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. वाई तालुक्यातील बावधन येथे असेच पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या दोन घुबडांना पक्षीमित्रांनी सोडवून जीवदान दिले.प्राणी, पक्षांचे ...

ठळक मुद्देपतंगाच्या मांज्यात अडकलेल्या दोन घुबडांना जीवदानअडकलेल्या दोन घुबडांना पक्षीमित्रांनी सोडवून दिले जीवदान

वाई : लहान मुलांमध्ये पतंग खेळण्याची मोठी हौस असते. यामुळे काही काळ मुलांचा खेळ होतोही पण हाच खेळ कधी स्वत:च्या तर कधी इतरांच्या जीवावर बेततो. असंख्य पक्षी मांज्यामध्ये अडकल्याने मृत्यूमुखी पडतात. त्याकडे कोणाचेच लक्ष नसते. वाई तालुक्यातील बावधन येथे असेच पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या दोन घुबडांना पक्षीमित्रांनी सोडवून जीवदान दिले.

प्राणी, पक्षांचे नैसर्गिक आवास धोक्यात येत आहे. अन्न-पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जंगलातील पक्षी, प्राणी अन्नाच्या शोधात लोकवस्तीच्याजवळ येतात. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून विष प्रयोग होत असल्याने दुर्मिळ पशु-पक्षांचा नाहक बळी जात आहे.बावधन येथे काही मुलं पतंग खेळत होते. अन् काही वेळेत दोन घुबडे पतंगाच्या दोऱ्यात अडकले. ही घटना दरेवाडी येथील सह्याद्री प्रोटेक्टर्सचे प्राणीमित्र सुरज अनिल यादव व शाहीर शरद यादव यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यास पतंगाच्या मांज्यामधून सोडवून पुढील उपचारासाठी वाई वनविभागाच्या ताब्यात आणून दिले.किसन वीर चौकानजीक रविवार पेठेतील सह्याद्री प्रोटेक्टर्सचे प्राणीमित्र अक्षय ढगे, विक्रम ढगे, शंकर ढगे यांना गव्हाणी घुबड जातीचे घाबरलेल्या स्थितीतील वन्यपक्षी मिळून आल्यावर त्यासही त्यांनी वनविभागाच्या ताब्यात दिले.दोन्ही घुबडांवर सह्याद्र्री प्रोटेक्टर्सचे वन्यजीवप्रेमी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्राथमिक उपचार केले. ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तंदुरुस्त असल्याबाबत सांगितल्यावर वाई वनविभागाचे वनपाल एस. एस. राजापुरे, वनरक्षक वैभव शिंदे व सुरेश सूर्यवंशी यांनी दोन्ही पक्षांस त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य