शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पान टपरी फोडणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:59 IST

सातारा येथील पोवई नाक्यावरील पानटपरी फोडून त्यामधील मोबाईलचे अ‍ॅक्सेसरीज चोरीस गेलेल्याचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपान टपरी फोडणाऱ्या दोघांना अटकचोरीचा मुद्देमाल जप्त : शहर पोलिसांची कारवाई

सातारा : येथील पोवई नाक्यावरील पानटपरी फोडून त्यामधील मोबाईलचे अ‍ॅक्सेसरीज चोरीस गेलेल्याचा छडा लावण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.चंद्रकांत पांडुरंग बनसोडे उर्फ पप्पू (वय २०, रा. पवार कॉलनी शाहूपुरी सातारा), श्रीकांत शंकर पवार उर्फ सोन्या (वय २०, रा. पंताचा गोट,सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोवई नाक्यावरील हेम एजन्सीच्या पाठीमागे एक टपरी आहे. या टपरीमधील मोबाईलचे अ‍ॅक्सेसरीज व इतर साहित्य असे एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने काही दिवसांपूर्वी चोरून नेला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.

सातारा शहरातील चोरी घरफोडीतील गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना वरील दोघा संशयिताविरोधात खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एन. एम. कदम, हवालदार दत्ता पवार, हवालदार उदय जाधव, प्रवीण पवार यांची एक टीम तयार करण्यात आली. या टीमने चंद्रकांत आणि श्रीकांतला गुरूवारी सायंकाळी विविध ठिकाणाहून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. पोलीस हवालदार उदय जाधव हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर