शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

दोन किलोचा कोबी केवळ दोन रुपयाला! शेतकऱ्यांची चेष्टा, बाजारपेठेत दर मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 02:47 IST

नलवडे यांनी उसात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले होते. त्यांनी सात हजार कोबीच्या रोपांची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली. यासाठी त्यांनी मोठी मेहनतही घेतली.

- शंकर पोळकोपर्डे हवेली (जि. सातारा) : सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचा माल कवडीमोलाने विकला जात आहे. दर मिळत नसल्याने पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी रविराज नलवडे यांनी एक एकर क्षेत्रावरील कोबीचे तोडे बंद केले आहेत.  नलवडे यांनी उसात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले होते. त्यांनी सात हजार कोबीच्या रोपांची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली. यासाठी त्यांनी मोठी मेहनतही घेतली. या खेपेला  चांगला मिळेल, या आशेवर त्यांनी उत्पादन खर्च जास्त केला. परिणामी, कोबीचे गड्डे चांगले आले होते. यामुळे ते खूप आनंदात होते. दोन किलोपासून अडीच किलोपर्यंतचे गड्डे होते. किलोवर गड्ड्याची विक्री केली जाते; पण सध्या बाजारपेठेत इतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोबीच्या गड्ड्यांची विक्री अल्प दरात होऊ लागली. दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयाला विकला जात असल्याने वाहतूक खर्चही परवडत नाही. त्यामुळे कोबीची काढणी बंद केली असून, शेतातच त्याची कापणी करायचे ठरवले आहे. यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने मोठ्या आशेने कोबीची लागवड केलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आली आहे. भाव नसल्याने अनेकांनी ट्रॅक्टर फिरवून कोबी जमिनीतच पुरला. हीच वेळ  या परिसरातील अनेक उत्पादकांवर आली आहे. थंडीचा मोसम कमी झाल्यानंतर हळूहळू कोबीचे दर वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.कोबीला दर नसल्यामुळे पै-पाहुणे, मित्र यांना मोफत कोबी वाटला असून, राहिलेले गड्डे कापून त्याचठिकाणी टाकणार आहे. ऊसाला खत होईल. रविराज नलवडे, शेतकरीवाहतूक खर्चही परवडेना दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयाला विकला जात असल्याने वाहतूक खर्चही परवडत नाही. त्यामुळे कोबीची काढणी बंद केली असून, शेतातच त्याची कापणी करायचे ठरवले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी