शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

जीप उलटून दोन ठार; बारा महिला गंभीर

By admin | Updated: March 13, 2017 17:08 IST

तारळेतील दुर्घटना : शेतमजूर महिलांवर काळाचा घाला; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

जीप उलटून दोन ठार; बारा महिला गंभीरतारळेतील दुर्घटना : शेतमजूर महिलांवर काळाचा घाला; चालकाचा ताबा सुटल्याने अपघाततारळे (सातारा) : चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्यानजीकच्या नाल्यात उलटून युवतीसह विवाहिता ठार झाली. तर बारा शेतमजूर महिला जखमी झाल्या. तारळे-घोट मार्गावर तारळे, ता. पाटण गावच्या हद्दीत शिवलिंग मंदिरानजीकच्या वळणावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशा नितीन कदम (वय २७) व सुनीता धोंडिराम काळे (२२, रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रंजना रमेश कदम, नंदा श्रीरंग कदम, सुशीला राजाराम महाडिक, सईबाई धोंडिराम काळे, अलका विलास कदम, सोनाबाई सुभाष कदम, भागुबाई आनंदा कदम, मनीषा सत्यवान कदम, द्रौपदा आनंदा कदम, भारती बाळकृष्ण जाधव, सुमन मारुती भंडारे (सर्व रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) व वंदना कृष्णत जाधव (रा. मरळोशी, ता. पाटण) या जखमींवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळे परिसरातील अनेक खासगी जीपमधून विभागातील महिला भांगलण तसेच वीटभट्टीच्या कामासाठी शिरगाव व उंब्रज परिसरात जातात. जांभेकरवाडी येथील महिलाही दररोज एका जीपने (एमएच ३० बी ६९३८) भांगलणीच्या कामासाठी जात होत्या. शनिवारीही संबंधित महिला कामावर गेल्या होत्या. दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळी त्या शिरगावहून तारळेत आल्या. शनिवारी तारळेचा आठवडी बाजाराचा दिवस असतो. संबंधित महिलांनी त्या बाजारात आवश्यक ती खरेदी केली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जीपमधून सर्व महिला जांभेकरवाडीकडे जाण्यासाठी निघाल्या. जीप तारळे गावच्या हद्दीतील शिवलिंग मंदिरानजीकच्या वळणावर पोहोचली. त्या वळणावर एक झाड पडले असून, ते निम्म्या रस्त्यापर्यंत आहे. तसेच वळणानजीकच एक ट्रकही लाईट सुरू करून थांबला होता. रस्त्यावर निम्म्यापर्यंत पडलेले झाड व समोरील ट्रकचा प्रकाशझोत यामुळे वेगात निघालेल्या जीपवरील चालकाचा ताबा सुटला. चालकाने जीप साईडपट्टीवर घेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने जीप नाल्यात जाऊन डाव्या बाजूवर उलटली.अपघातानंतर महिलांनी आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी मिळेल त्या वाहनाने जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. काही महिलांना सातारच्या शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये उपचार सुरू असताना आशा कदम व सुनीता काळे या दोघींचा मृत्यू झाला. इतर जखमींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद तारळे पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे. उपनिरीक्षक एम. के. आवळे तपास करीत आहेत. चालकावर गुन्हा दाखलतारळेनजीक शिवलिंग मंदिर येथे असणारे संबंधित वळण धोकादायक असून, या वळणावर अनेकवेळा चालकांची फसगत होते. शनिवारी रात्री झालेल्या अपघातप्रकरणी नितीन मारुती कदम यांनी तारळे पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार जीप चालक महेश बाळासाहेब जाधव (वय ३७, रा. तारळे, ता. पाटण) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.