शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: धोंडेवाडीत भरवस्तीत गव्याचा हल्ला, दोघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:51 IST

वनाधिकाऱ्यांकडून विचारपूस

मलकापूर : धोंडेवाडी (ता. कराड) येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजता हनुमान चौकात मुलाला तर १० वाजता दऱ्यात एका वृद्धाला गव्याने धडक देऊन जखमी केले. घटनेनंतर तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारसपूस केली.वेदांत संतोष पाटील (वय १६) व सदाशिव धोंडिराम काकडे (८५ दोघेही रा. धोंडेवाडी, ता. कराड ) अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धोंडेवाडी, ता. कराड येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन गवे थेट लोकवस्तीत घुसले. त्यांना गावातून हुसकावताना हनुमान चौकात उभ्या असलेल्या एका मुलाला धडक देऊन गावाबाहेर गेले. पुढे जाऊन रानातून घरी येत असलेल्या एका वृद्धाला धडक देऊन जखमी केले. या दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, सुहास भोसले, वनरक्षक अभिजित शेळके, कैलास सानप, अक्षय पाटील, रोहन मान, अभिनंदन सावंत, निखिल कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी जखमी केलेल्या घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांमध्ये गव्याबाबत जनजागृती कली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Gaur attack in Dhondewadi injures two; panic ensues.

Web Summary : Two injured in Dhondewadi, Karad after gaur attacks. A boy and an elderly man were hit. Forest officials investigated and provided awareness.