शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:19 IST

Crimenews police Satara- दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्लयावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला.

ठळक मुद्देअंधश्रद्धेतून मुलीचा बळी घेणाऱ्या दोन भोंदूबाबांना अटक दहिवडीतील घटनेने समाजमन सून्न; अंनिसच्या समयसूचकतेमुळे प्रकार उघड

सातारा: दोन भोंदूबाबांनी भूतबाधा झाल्याच्या दिलेल्या सल्लयावर विश्वास ठेवून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षांच्या मुलीचा हकनाक बळी गेला.

हा प्रकार अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रशांत पोतदार यांना समजल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सूत्रे हालवून दोन्हीही भोंदूबाबांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली.रामचंद्र तुकाराम सावंत (वय ४५, रा. मोही, ता. माण), उत्तम कोंडीबा अवघडे (वय ५५, रा. गोंदवले, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्या वस्ती आहे.

या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चौदा वर्षीय मुलीचे सतत डोके दुखत होते. तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील उत्तम अवघडे या भोंदूबाबाकडे नेले. त्याने तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे.

अमावास्येपर्यंत ठीक होइल, असे सांगून मंत्रतंत्र करून त्यांना परत घरी पाठवले. त्याच दिवशी सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या भोंदूकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पौर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत. ते ठीक होणे खूप कठीण आहे, असे सांगितले. रात्री बाराला पाच मिनिटे बाकी असतानाच मृत्यू२० तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत बायलीला भयंकर धोका आहे, असे सांगून भोंदूबाबाने मंत्रतत्र व अंगारे धुपारे करून परत तिला घरी पाठवले. शनिवारी २० तारखेच्या रात्री घरातील सर्वजण बायलीला गराडा घालून काय होतेय ते केवळ बघत बसले. बायली शांत बसली होती. व तिचे हातपाय थरथर कापत होते. पण तरीही सगळ्यांच्या नजरा घडाळ्याच्या काट्याकडे होत्या. सर्वजण बारा वाजण्याची वाट पाहात होते.

रात्री बाराला पाच मिनिटे कमी असातना बायली निपचित पडली. यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे देवऋषींनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच भूताने बायलीला नेले, असा समज करून कुटुंबीयांनी काहीही बोभाटा न करता बायलीचा मृतदेहाचे जवळ असलेल्या ओढ्याच्या शेजारी दफन केले. घटना कशी उघड झाली...ही घटना दहिवडीचे सैन्य दलातील जवान सुनील काटकर यांना अंनिसचे प्रशांत पोतदार यांना सांगितली. समाजात नाचक्की होइल तसेच देवऋषींच्या भीतीने या मुलीच्या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला. व आमची काहीही तक्रार नाही, असेही सांगितले. परंतु पोतदार यांनी याचा पाठपुरावा सुरू ठेवला.

अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना भेटून त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर रात्रीचं सर्व सूत्रे हालली आणि काही वेळातच दोन्ही भोंदूबाबांना दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर