शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ, कोरेगावात मुलींसाठी दोन वसतिगृहे शासनाकडून कोट्यवधींच्या निधीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:53 IST

शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर

ठळक मुद्दे -‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश :

मुराद पटेल ।शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर ७ आणि जिल्हा व तालुकास्तरावर ४३ अशा ५० ठिकाणी नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यात आली होती. पैकी सातारा जिल्ह्यातील शिरवळ, कोरेगाव येथील दोन शासकीय वसतिगृहांना शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे.

याबाबत ‘लोकमत’ने १० जानेवारी २०१८ रोजी ‘मुलींच्या वसतिगृहाला दशकाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करीत या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानुसार शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त वसतिगृहांच्या उभारणीसाठी १० कोटी ७५ लाख ९१ हजार ४५९ रुपयांच्या अंदाजपत्रकास नुकतीच प्रशाकीय मान्यता दिली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या १९ मे २०१० च्या आदेशाने शिरवळ येथील गट नं. ९४४ मध्ये समाजकल्याण अधीक्षक वसतिगृहासाठी १ हेक्टर ६० आर जमीन सामाजिक न्याय विभागाच्या नावे देण्यात आली होती. तत्कालीन आघाडी शासनाच्या काळातील मुलींसाठीची वसतिगृहाची ही घोषणा ११ वर्षांपासून फक्त कागदावरच राहिली होती. सामाजिक न्याय विभागाच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाने वसतिगृह इमारत उभारणीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ११ ते १२ कोटींचा अंदाजपत्रकीय प्रस्ताव शासनास सादर केला होता.

या प्रस्तावाला शासनाकडून नुकतीच मान्यता मिळाली असून, शासनाच्या १२ मार्च २०१८ च्या परिपत्रकान्वये शिरवळ येथील गट नं. ९४४ मधील १ हेक्टर ६० आर जागेत शंभर खाटांचे मागासवर्गीय वसतिगृह उभारणीकरिता १० कोटी ७५ लाख ९१ हजार ४५९ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रशासकीय मान्यतेची बातमी कळताच शिरवळ नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करून ‘लोकमत’चे आभार मानले. 

शिरवळ, नायगाव ग्रामस्थांसह ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने शिरवळच्या मुलींच्या वसतिगृहाला शाशनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याबद्दल मनापासून आभारी आहे.- राजेंद्र नेवसे, माजी सरपंच, नायगाववसतिगृहाच्या अंदाजपत्रकास नुकतीच मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पाठपुरावा करून निधी वर्ग करून शिरवळच्या भर घालणाºाा मुलींच्या वसतिगृहाची उभारणी लवकरात लवकर करावी.- विजयकुमार गायकवाड,सहायक आयुक्त, समाजकल्याण विभागशिरवळचे वैभव वाढवणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी शिरवळकरांकांनी जमीन उपलब्ध करून दिली होती. वसतिगृहाला कोट्यवधींचा निधी मिळाल्याने शिरवळच्या विकासाला चालना मिळेल.- राजेंद्र तांबे, सदस्य, खंडाळा पंचायत समिती

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMONEYपैसा