शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:00 IST

तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसोनगाव येथे दोन गटांत तुंबळ मारामारी, सहाजण गंभीर जखमीपरस्पर तक्रारीवरून १९ जणांवर गुन्हा ; तीन वर्षांपूर्वीचा वाद उफळला

सातारा : तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.अजय विजय शिंदे (वय २३, रा. सोनगाव सं. निंब. पो. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) हा या वादावादीत गंभीर जखमी झाला असून, त्याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून अजित धनाजी शिंदे, रणजित धनाजी शिंदे, धनाजी अर्जुन शिंदे यांनी हातात कुऱ्हाड, कोयता, खुरपे व लाकडी दांडके घेऊन दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजता माझ्यावर हल्ला केला.

तसेच विजय मारूती शिंदे, गणेश कदम, विकास मोहन कदम, मोहन रामचंद्र कदम यांच्या डोक्यात, कानावर, हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर सावित्री धनाजी शिंदे हिने वरील संशयितांना कोयता, कुऱ्हाड, खुरपे, लाकडी दांडके आदी साहित्य देऊन संबंधितांना मारहाण करण्यास प्रवृत्त केले. यावरून अजित शिंदे, रणजित शिंदे, धनाजी शिंदे, सावित्री शिंदे (सर्व रा. सोनगाव तर्फे सं. लिंब, सातारा) यांच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.अजित धनाजी शिंदे (वय ३२, रा. सोनगाव सं. निंब ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकूण १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये गणेश दामन कदम, अजय विजय शिंदे, मिराबाई शिंदे, विकास मोहन कदम, विनोद अजय शिंदे, प्रेमा मोहन कदम, तुळशीराम रामचंद्र शिंदे, विजय रामचंद्र शिंदे, प्रवीण रामचंद्र कदम, मोहन कदम (सर्व रा. माहुली सोनगाव, निंब सातारा) यांच्यासह अन्य पाचजणांचा समावेश आहे.जुन्या भांडणाच्या कारणावरून अजित शिंदे यांना गणेश कदम आणि अजय शिंदे यांनी बेदम मारहाण केली. तर मिराबाई शिंदे हिने अजितच्या तोंडावर दगड मारला. तसेच तुळशीराम शिंदेनेही अजितच्या डाव्या बाजूच्या कानाजवळ दगड मारला. हा वाद सोडविण्यासाठी अजितचे वडील धनाजी शिंदे आले असता मोहन कदमने त्यांच्या डोक्यात कोयता मारला. भाऊ रणजित यास विजय शिंदेने काठीने डोक्यात मारले. दरम्यान, या मारामारी प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर