शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

साताऱ्यात खासगी सावकारीचे दोन गुन्हे, पाच जणांच्या विरोधात तक्रार 

By दीपक शिंदे | Updated: March 28, 2023 15:41 IST

सातारा : सातारा शहरात खासगी सावकारीचे दोन प्रकार घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विराेधात गुन्हा नोंद करण्यात ...

सातारा : सातारा शहरात खासगी सावकारीचे दोन प्रकार घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विराेधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे यातील संशयितांनी व्याजाचा दर ५ आणि १० टक्के इतका ठेवला होता.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका प्रकरणात रोहित सुरेश शेंडे (रा. न्यू विकासनगर खेड सातारा) या लेबर सप्लाय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय ज्ञानेश्वर जाधव (रा. सायगाव, ता. कोरेगाव) आणि अनोळखी दोघांवर गुन्हा नोंद झालेला आहे. तक्रारीनुसार हा प्रकार १४ ते २७ मार्च दरम्यान घडला आहे. तक्रारदार रोहित शेंडे यांनी व्यवसायासाठी संजय जाधव कडून वेळोवेळी ६ लाख रुपये १० टक्के व्याजाने ऑनलाइन पद्धतीने घेतले होते.

त्यानंतर शेंडेंनी संजय जाधवला मुद्दल ६ लाख आणि व्याजाचे ३ लाख ऑनलाइन पद्धतीने दिले. तरीही जाधव व अनोळखी दोघांनी तक्रारदार शेंडेंच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली. तसेच पैस न दिल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शेंडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.दुसरी तक्रार जफर गुलाम खान (रा. देवी काॅलनी, सातारा. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर प्रिया नीलेश नाईक, नीलेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार ४ जानेवारीला साताऱ्यातील एका रुग्णालयात घडला आहे. यातील तक्रारदार खान यांनी संशयितांकडून ६० हजार रुपये ५ टक्के व्याज दराने घेतले होते. 

त्यावेळी व्याजाची रक्कम जादा असल्याने तक्रादाराने विचारणा केली. यावर संशयितांनी १०० रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी रुग्णालयाची इन्चार्ज आहे. मी तुझी रुग्णालयातील नोकरी घालवीन तसेच कर्ज आणि व्याज वेळच्या वेळी दिले नाही तर दिवसाला ५०० रुपये दंड द्यावा लागेल अशी धमकी देण्यात आली. त्यातच मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्याने तक्रारदार खानने सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगवान निंबाळकर हे माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी