शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:58 IST

सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, बुधवारी रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.

ठळक मुद्देचंद्रकांतदादांच्या रात्रीत दोन गोपनीय बैठका, साताऱ्यातील नागरिकांशी संवाद भाजप नगरसेवकांच्या घरीही दिली भेट

सातारा : सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सूचना केली असून, रात्री तर त्यांनी दोन-तीन गोपनीय बैठकाही घेतल्या. तसेच भाजपच्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या घरी भेट देत नागरिकांशीही संवाद साधला.सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यात झाली होती. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना या दोन्ही बालेकिल्ल्यांना खिंडार पाडा, केंद्रात भाजपचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांना युतीचाच उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.

साताऱ्यातील उमदेवार शिवसेनेचा असलातरी पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार असल्याचे ठरवून काम करण्यास सांगितले होते. त्यानंतर मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताऱ्यातील भाजपचे नगरसेवक असणाऱ्या धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सागर पावशे, आशा पंडित, सिद्धी पवार, प्राची शहाणे यांच्या घरी भेट दिली. यादरम्यान त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला.खासदार हा लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी असतो; पण साताऱ्यात तसे होताना दिसून येत नाही. याचा विचार आता नागरिकांनीच करण्याची गरज आहे, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मंत्री पाटील यांनी रात्रीच्या सुमारासच साताऱ्यात दोन-तीन ठिकाणी गोपनीय बैठकाही घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत ते कोणाशी बोलले, काय चर्चा केली? याचे स्पष्टीकरण देण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलsatara-pcसातारा