शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मलकापुरात वाहतूक बदलाची अडीच तास चाचणी; कोंडीने वाहनधारक बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:53 IST

लाँचर मशीन उतरवण्यासाठी त्रुटी दूर करून निर्णय

मलकापूर : उड्डाणपुलासाठी वापरलेले लाँचर मशीन उतरवण्यासाठी रविवारी शिवछावा चौकात अडीच तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली. चाचणीवेळी अचानक वाहतुकीत बदल केल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूककोंडी झाली हाती. त्रुटी दूर करून पुढील निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले.येथील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे लाँचर मशीन उतरवण्याचा काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. हे मशीन उतरवण्याचे काम पंधरा दिवस चालणार आहे. यासाठी शिवछावा चौकातील जागा निश्चित केली आहे. हा परिसर अतिशय वर्दळीचा असल्याने प्रशासनाकडून आधी चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. लाँचर उतरवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. त्यानुसार रविवारी शिवछावा चौकात पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, अदानीचे मुकेश, डीपी जैनचे नागेश्वर राव, राजीव बक्षी, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली.यासाठी पोलिस उपनिरीक्षक विजय बोहिटे, भैरीनाथ कांबळे, संभाजी उटुगडे, दस्तगीर आगा, महेश चाबुकसवार, याच्यासह कर्मचारी व १३ वॉर्डन आणि शेवनस्टार ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. चाचणीवेळी अचानक वाहतुकीत बदल केल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन काहीकाळ वाहतूककोंडी झाली हाती.

शिवछावा चौकात छेदरस्त्यासह एक मार्ग बंदशिवछावा चौकात एक मार्ग बंद करून ढेबेवाडीकडे जाणारी व येणारी वाहतूक दुभाजक लावून एकाच बाजूने सुरू केली होती. तर चौकातील छेदरस्ता बंद केला होता. त्यासाठी चौकाच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर यूटर्न तयार केले होते. महामार्गावरील वाहतूक स्लिप रोडवरून वळवली होती.