शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:30 IST

दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना, जनतेचा जीव ...

दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना, जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

माण तालुक्यात दीड हजार कोरोनाबाधित आहेत. तुलनेत आरोग्य सुविधा अपुरी आहे. चार व्हेंटिलेटर, २७ ऑक्सिजन बेड आहेत. कोविड सेंटरमध्ये विलगीकरण बेडची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना इतर तालुक्यात, शहरात अथवा जिल्ह्यात भटकावे लागते. कोरोना सेंटरमध्ये योग्य सुविधा वा जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण घरीच अलगीकरणात आहेत. अनेक रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅबिफ्लू या गोळ्या मिळत नाहीत. ऑक्सिजनअभावी कित्येक जण तडफडत आहेत. तालुक्यातील नेतेमंडळी, तसेच सामाजिक संस्थांनी कोरोना सेंटरसाठी पुढाकार घेतला आहे, परंतु अजूनही मदतीची आवश्यकता आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन पंचायत समितीचे प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील व सहकारी रमेश पाटोळे, कविता जगदाळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, लतिका विरकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्रभागा आटपाडकर यांनी या लढ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याचे दोन लाख असे वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘माणमधील दीड हजार रुग्णांपैकी एक हजार कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ल्याने फॅबी फ्लू गोळ्या दिल्या, तर लवकर बरे होतील.’

गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर यांच्या सल्ल्याने संबंधित रक्कम खर्च करण्याचे सूचित केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये फॅबी फ्लू गोळ्यांसाठी, ५.५ लाख रुपये ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरसाठी, २ लाख रुपये जम्बो सिलिंडरसाठी तर १ लाख रुपये जनजागृतीसाठी वापरण्याचे निश्चित केले. उर्वरित रक्कमही आवश्यक असेल, तशी वापरण्याचा निर्णय घेतला.

चौकट :

प्रशासन जनतेसोबत कायम

माणची जनता कोरोनाच्या भयंकर संकटात सापडली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात माण पंचायत समिती जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील यांनी दिली.