शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून ; मित्रानानेच बदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:38 IST

Murder Sataranews-म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सून्न करणाऱ्या या घटनेने अनेकांची मने हेलावून गेली.

ठळक मुद्देबारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून शिवीगाळीचा घेतला मित्रानानेच बदला; अल्पवयीन मुलगा ताब्यात

सातारा : म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सून्न करणाऱ्या या घटनेने अनेकांची मने हेलावून गेली.गंगाराम रमेश राठोड (वय १२, रा. म्हसवे, ता. सातारा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगाराम हा मंगळवार, दि. ५ रोजी सायंकाळी घरासमोरून अचानक बेपत्ता झाला. मुलगा बराचवेळ घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती.दरम्यान, बुधवारी सायंकाळी म्हसवडे येथील एका ऊसाच्या शेताजवळ गंगारामचा पायमोजा पडला असल्याचे त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ श्वानाला पाचारण केले. श्वान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला गंगारामच्या पायमोजाचा वास देण्यात आला. श्वान धावतच उसाच्या शेतातून पलीकडच्या शेतात गेले. त्या ठिकाणी गंगारामचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

मृतदेहाशेजारी सात ते आठ दगड पडले होते. गंगारामचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मात्र, हा खून नेमका कोणी केला, याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्यासोबत कायम असणाऱ्या त्याच्या १६ वर्षाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

त्यावेळी तो घाबरल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. काही दिवसांपर्वूी गंगाराम आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गंगारामने त्याला शिवीगाळ केली. याचा बदला म्हणून त्याने गंगारामचा खून केला. घटनास्थळाचे चित्र विदारक...गंगाराम राठोडचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. डोके, तोंड आणि छातीवर दगड मारण्यात आले आहेत. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने म्हसवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस