शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

बारा स्वच्छतागृहे आली दिमतीला!

By admin | Updated: July 12, 2015 00:35 IST

फिरते शौचालयही : ‘स्वच्छ-सुंदर सातारा’साठी पालिका प्रशासन सरसावले

दत्ता यादव / सातारा सातारा शहर हे एलईडी, स्मार्ट सीटीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच आता स्वच्छ आणि सुंदर सातारा सीटी होण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. एक फिरते शौचालय आणि बारा स्वच्छतागृहे नागरिकांच्या सेवेस लवकरच सज्ज होणार असल्याने नागरिकांची कुचंबणा तर थांबणारच; शिवाय नागरिकांचे आरोग्यमानही उंचावणार आहे. शहरामध्ये इन मीन तीन शौचालये आणि पाच ते सहा स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होऊ लागली आहे. त्यामध्ये विशेषत: महिलांपुढे मोठी अडचण आणि समस्या निर्माण होत असते. अशा खासगी गोष्टीवर महिलांना उघडपणे बोलता येत नसल्यामुळे प्रशासनापर्यंत ही महत्त्वाची समस्या आत्तापर्यंत पोहोचत नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वॉर्ड कमिटीच्या बैठकीत हाच महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला. आणि कमिटीतील सदस्यांनी स्वच्छतागृह नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जागा दाखवा.. स्वच्छतागृहे उभारू, असे सांगितले होते. मात्र जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही. त्यामुळे पुढे होऊन आपल्यालाच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाला मीहिती असल्याने ‘स्वच्छ सातारा’साठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या, तसेच त्याची अंमलबजावणीही केली. शहरामध्ये आत्तापर्यंत महिलांसाठी रस्त्यावर आणि मोक्याच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे महिलांसाठी ७ सिंगल स्वच्छतागृहे आणि पुरुषांची ५ डबल स्वच्छतागृहे पालिकेने नुकतीच खरेदी केली आहेत. शहरातील राजवाडा, पाचशेएक पाटी, पोवई नाका, बसस्थानक, जुना मोटार स्टॅण्ड आदी मोक्याच्या ठिकाणी ही स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. या भागातील स्थानिक नगरसेवक आणि तेथील नागरिकांना विश्वासात घेतले जाणार आहे. आपल्या घराजवळ स्वच्छतागृह नको, अशी अनेक लोकांची तक्रार असते. त्यामुळे अशा तक्रारींचे निराकरण करताना पालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे. स्वच्छ आणि सुंदर सातारासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्याही अत्याधुनिक बनविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ३९ वॉर्डमध्ये असलेल्या घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे काम अत्यंत हलके झाले आहे. या ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे घंटागाड्यांच्या खेपा किती झाल्या हे समजणार आहे. तसेच घंटागाडी शहरामध्ये कुठे आहे, कोणत्या परिसरात जाते हे समजणार असल्याने रोज कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळली शहरामध्ये स्वच्छतागृहे ठेवण्यात आल्यानंतर येत्या दोन दिवसांत फिरते शौचालयही नागरिकांच्या सेवेस सज्ज होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेहमी आंदोलन, मोर्चे होत असतात. या ठिकाणी कसलीही सोय नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांची कुंचबणा होत होती. आता या फिरत्या शौचालयामुळे आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळणार आहे. तसेच शहरामध्ये अनेकदा मोठे सार्वजनिक कार्यक्रमही होत असतात. त्यावेळीही या फिरत्या शौचालयाचा सातारकरांना उपयोग होणार आहे. आता १२ स्वच्छतागृहे आणि एक फिरते शौचालय चोवीस तास उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.