कोरोनाच्या संकटामुळे लांबलेली ग्रामपंचायत कर वसुली आता वेगाने सुरू झाली आहे. त्यासाठी पंचायत समितीकडून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, पंचायत समिती सदस्य व गट विकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी मोहीम राबवून आत्तापर्यंत तीनशेपेक्षा जास्त नळ कनेक्शन तोडली आहेत. ग्रामपंचायत विभागाकडून उंब्रज, आदर्शनगर, तळबीड, वडगाव, शिवडे, बेलवडे हवेली, कोर्टी, शिरगाव, चोरे, चरेगाव, मस्करवाडी, कळंत्रेवाडी, हरपळवाडी, इंदोली, हिंगनोळे, तासवडे, कोरीवळे, नानेगाव, पेरले, गोडवाडी, वराडे, येरवळे, कोयना वसाहत, विरवडे, नांदलापूर, बनवडी, बेलदरे, भोळेवाडी, राजमाची, वनवासमाची, साकुर्डी, केसे, हजारमाची, सैदापूर, वारुंजी आणि मुंढे ग्रामपंचायतींमार्फत एका दिवसात तब्बल १२ लाख १९ हजार ८९० रुपयांचा कर वसूल केला आहे.
कऱ्हाड तालुक्यात दिवसात बारा लाखाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST