शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अवकाळीच्या तडाख्याने हळद रूसली!

By admin | Updated: March 11, 2015 00:13 IST

शेकडो पोती भिजली : हातातोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकरी चिंतेत; शिवारात अद्यापही वाळवणीची लगबग

कऱ्हाड : हंगामात हळदीचे उत्पन्न चांगले मिळण्याच्या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, मध्यंतरी हळदीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यातच गत आठवड्यात अवकाळी पावसाचाही तडाखा बसला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कऱ्हाड तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. वडगाव हवेली, चचेगाव, जखिणवाडी, कापिल, सुपने, तांबवे, मसुर भागासह इतर गावांतही शेतकरी हळद पिक घेतात. दरवर्षी हळदीचा दर कमी जास्त होतो. मात्र, हे पिक फायद्यात जात असल्याने शेतकऱ्यांचा हे पिक घेण्याकडे सध्या ओढा वाढला आहे. दरवर्षी ऊसाच्या दराचा प्रश्न निर्माण होतो. ऊसाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच कारखान्यांकडून वेळेत ऊसतोडणीही मिळत नाही. त्यामुळे कालावधी उलटून गेला तरी दरवर्षी ऊस शेतातच उभा असतो. परीणामी, पुढील पिकाला त्याचा मोठा फटका बसतो. ऊसाचा उत्पादन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा सारासार विचार केला असता शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. अल्प भुधारक काही शेतकरी ऊस शेतीमुळे तोट्यात गेल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. अशा परीस्थितीत हळद पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने गत दोन वर्षापासुन तालुक्यातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. साधारणपणे मे अथवा जुन महिन्यात हळद पिकाची लागवड केली जाते. लागवडीनंतर वारंवार शेतकऱ्यांना खुरपणी करावी लागते. तसेच हळदीसाठी सेंद्रीय खतही मोठ्या प्रमाणावर लागते. सेंद्रीय खत चांगले प्रमाणात मिळाले तर त्याचा पिकावर चांगला परीणाम दिसुन येतो. रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करावी लागते. वारंवार औषधांची फवारणी तसेच रासायनीक खताचा डोसही द्यावा लागतो. एवढे करूनही निसर्गाने साथ दिली नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ते पाणी शेतातच साचून राहिले तर पिक वाया जाण्याची भिती असते. त्यासाठीही शेतकऱ्यांना धडपड करून शेतात पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. पावसाळा उलटून गेल्यानंतर हिवाळ्यात धुक्यामुळे हळद पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होता. यावर मात करण्यासाठी शेतकरी रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागते. साधारपणे हळद पिक आठ महिन्यांचे असते. आठ महिने पुर्ण झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी अखेरीस हळदीचा पाला कापण्यास सुरूवात केली जाते. त्यानंतर खणणी व मोडणीही होते. मोडणीचे काम पुर्ण झाल्यानंतर हळद उकडावी लागते. मात्र, याच कालावधीत शेतकऱ्याला पिकाची जास्त काळजी घ्यावी लागते. उकडलेल्या हळदीवर पाऊस पडल्यास संपुर्ण उत्पन्न वाया जाण्याची भिती असते. त्यामुळे या कालावधीत येणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी शत्रुच असतो. यावर्षीही काही दिवसांपुर्वी अवकाळी पावसाचा कऱ्हाड तालुक्याला तडाखा बसला. उकडून वाळवणी करण्यासाठी टाकलेली हळद पावसात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. भिजलेल्या हळदीचा सध्या रंग बदलला आहे. त्यामुळे या हळदीतून शेतकऱ्यांना कसलेही उत्पन्न मिळणार नाही. सध्याही काही ठिकाणी हळद काढणीची कामे सुरू आहेत. उकडणी व वाळवणीसाठी शेतकरी धडपडत आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मनातून पावसाची भिती गेलेली नाही. पाऊस कोसळला तर इतर शेतकऱ्यांची हळदही वाया जाण्याची शक्यता आहे. हळद भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या असल्या तरी काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने हळद शेतकऱ्यांवर रूसल्याचेच सध्या दिसुन येत आहे. (प्रतिनिधी)दराबाबत अद्यापही संभ्रम...गत तीन वर्षात हळदीचे भाव कमी झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या पिकाकडे पाठ फिरविली होती. त्या कालावधीत साधारणपणे हळदीचे ३० टक्के क्षेत्र कमी झाले होते. गत काही महिन्यांपुर्वी व्यापाऱ्यांकडे हळद शिल्लक नसल्याचे सांगीतले जात होते. त्यामुळे हळदीला पंधरा हजारापर्यंत भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. अशातच हळदीचे सौदे सुरू झाले आणि संप पुकारण्यात आल्याने सौद्यांची प्रक्रिया थांबली. परीणामी, शेतकऱ्यांनी हळद तयार होऊनही घरातच पोत्यांचा साठा करून ठेवला आहे.