शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टाळ मृदंगासह त्रिवेणी संमेलनाने गजबजली उंब्रजनगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 13:53 IST

टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली.

ठळक मुद्देटाळ मृदंगासह त्रिवेणी संमेलनाने गजबजली उंब्रजनगरीग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ : तरुणाईसह नागरिकांमध्ये उत्साह

उंब्रज : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील मंडळीनी संस्कृती दर्शन ....चौकाचौकातील रांगोळ्यांच्या पायघड्या .....महिलांनी धरलेला फेर..... टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली.

उंब्रज, ता. कऱ्हाड येथील त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. साहित्य संमेलनाचे संयोजक, नागरिक यासह महिला वर्ग यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी शुक्रवारी सकाळी महात्मा गांधी विद्यालयात नागरिक, महिला, युवक, सर्व विद्यार्थी एकत्रित जमा झाले.

ढोलताशाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी तसेच विविध वेशभूषा केलेल्या लहान थोरांपासून शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असलेल्या आकर्षक आणि जल्लोषाने लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.मुलींचा सहभाग तर विशेष उल्लेखनीय होता. नऊवारी साडी, नाकात नथ अशा पारंपरिक वेशात महिलावर्गाने घोड्यावर स्वार होऊन ग्रंथदिंडीची शोभा वाढवली. विद्यालयातून ग्रंथदिंडीस सुरुवात होऊन दिंडी सुरभी चौकमार्गे, चोरे रोड, बसस्थानक परिसर करून माणिक चौकमार्गे, भैरवनाथ मंदिराकडून ग्रामपंचायत कार्यालय रोडने बाजारपेठेतील साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपात आली.

यावेळी नागरिक, युवक, महिलांनी दुतर्फा उभे राहून दिंडीचे स्वागत केले. यावेळी युवतींनी बाजारपेठेत लेझीम पथकाचा कार्यक्रम सादर केला. अनेक ठिकाणी दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

या दिंडीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली घोड्यावर स्वार झालेले शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वेशभूषा केलेले युवक व युवती. तसेच अनेक देखाव्यांचा समावेश यामध्ये होता. यामध्ये साहित्यिक, कवी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यSatara areaसातारा परिसर