शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... फलकाच्या साक्षीनं झाडं तोड रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 22:36 IST

मलटण : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील झाडावर याच कार्यालयाने कुºहाड चालवली.

विकास शिंदे ।मलटण : येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या आवारातील झाडावर याच कार्यालयाने कुºहाड चालवली. झाडाशेजारीच ‘झाडे लावा, झाडे जगवा,’ हा संदेशही कुऱ्हाडीचे वार करणाºयांना दिसला कसा नाही?, असा सवाल वृक्षप्रेमींकडून विचारला जात आहे.

फलटण येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या इमारतीच्या प्रांगणात एक सुबाभळीचे झाड होते. हे झाड एका बाजूने उन्मळू लागल्याने रस्त्यावर पडण्याची शक्यता होती म्हणे. याच्या काही फांद्या कंपाऊंड भिंतीच्या आधारे टेकून उभ्या होत्या. वास्तविक, हे झाड कधीही पडले असते. शेजारून सतत वाहणारा रस्ता असल्याने झाड रस्त्यावर पडून अपघात होण्याची शक्यता अधिक होती, असेही सांगितले गेले.

मात्र, हे झाड काढले गेले, त्याच्या शेजारीच ‘झाडे लावा झाडे जगवा,’ असा भिंतीवर मजकूर रंगवला गेला आहे. यातलं ‘झाडे जगवा’ हे सामाजिक वनीकरण कार्यालयासाठी बहुतेक लागू नसावे.

आज अनेक यंत्र उपलब्ध आहेत, एका बाजूने उन्मळू लागलेला हा वृक्ष खरोखरच बुंध्यापासून तोडण्याची शक्यता नव्हती, हे झाड वाचवता आले असते, याचे पुन:रोपण करता आले असते, यात हे झाड जगण्याची पन्नास टक्के तरी शक्यता होती; पण एका बाजूला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देणारे वनीकरण स्वत: मात्र कोणताच प्रयत्न न करता झाड बुंध्यापासून कापून काढला.

फलटण सुशोभित होत असताना नवीन अनेक वृक्षलागवड चालू असताना जुनं झाडही वाचवता आलं असतं. कदाचित ते जगलं नसतं; पण सामाजिक वनीकरणाचा ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश लोकांच्या हृदयापर्यंत पोहचला असता; पण आता त्याचा बुंधाच फक्त शिल्लक आहे.पुन:रोपण व्हायलाच हवेपुन:रोपण ही प्रक्रिया खर्चिक असली तरी ती आजची गरज आहे. या माध्यमातून आपण थोडे तरी वृक्ष वाचवू शकतो. पुणे मेट्रोच्या कामावेळी असे अनेक वृक्ष वाचवले होते. पुणे-पंढरपूर महामार्गाच्या कामात अशी खूप झाडे वाचवली होती. आज ती चांगली बहरली आहेत.फलटण येथे ‘वृक्ष वाचवा’ फलकांच्या साक्षीने तोडलेल्या झाडाचे ओंडके अशा पध्दतीने पडले होते.

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर