शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा येथील कर्मवीर कॉलनीत कचऱ्यांचे ढीग; घंटागाडी एकीकडे.. कचरा दुसरीकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:34 IST

 सातारा येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

ठळक मुद्देराधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातरस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक कचरा टाकत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे पालिकेच्या दारात कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशारा

 सातारा : येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये रस्त्याकडेलाच कचऱ्यांचे ढीग साचले असून, घंटागाडी एकीकडे तर कचरा दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत असून, पालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे.राधिका रस्त्यावर कर्मवीर कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चक्क रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना तोंडाला रुमाला लावून जावे लागत आहे.

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याचे फोटो काढून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. मात्र, तरी सुद्धा याची कोणी दखल घेतली नाही. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हा कचरा टाकत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणी कचरा कुंडीही नाही. तरीही कचरा टाकला जात आहे.

काही दिवसांपूर्वी या कचऱ्याशेजारी शाळेच्या मुलांची रिक्षा तेथे थांबली होती. त्यावेळी चिमुकल्यांनी रिक्षा चालकाला तेथून बाजूला रिक्षा नेण्यास सांगितले. हा प्रकार तेथे असणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्या चिमुकल्यांचा फोटो काढून पालिकेत दिला.

मात्र अद्यापही याचा फारसा पालिकेच्या आरोग्य विभागावर फरक पडलेला दिसत नाही. हा कचरा तातडीने उचलला नाही तर पालिकेच्या दारात हा कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.घंटागाडी या परिसरात येते की नाही, हे कळायला मार्ग नाही, असे येथील रहिवासी सांगत आहेत. जर घंटागाडी येत असेल तर त्यांना रस्त्याकडेला असलेला कचरा कसा दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका