शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रीपल सीट युवकांकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण, क-हाडात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 14:10 IST

एकाच दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकांना अडविल्यानंतर संबंधित युवकांनी दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण केली. संबंधित युवकांनी पोलिसांना अक्षरश: रस्त्यावर पाडून मारले.

 क-हाड : एकाच दुचाकीवरून तिघेजण निघालेल्या युवकांना अडविल्यानंतर संबंधित युवकांनी दोन वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण केली. संबंधित युवकांनी पोलिसांना अक्षरश: रस्त्यावर पाडून मारले. ही संतापजनक घटना शहरातील दत्त चौकात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हवालदार उमेश बाजीराव माने व सहायक फौजदार बळवंत दादू चव्हाण अशी मारहाण झालेल्या वाहतूक पोलिसांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश माने हे रविवारी दुपारी दत्त चौकात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बसस्थानकाकडून एका दुचाकीवरून तीन युवक येत असल्याचे हवालदार माने यांच्या निदर्शनास आले. माने यांनी संबंधित दुचाकी अडविली. तसेच दुचाकी चालविणाºया युवकाकडे वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी केली. मात्र, संबंधित युवकाने अरेरावी करीत माने यांना धमकावण्यास सुरुवात केली. ह्यमी कोण आहे तुला माहिती आहे का?ह्ण असे म्हणत त्याने माने यांच्या कॉलरला हात घातला. त्यावेळी सहायक फौजदार चव्हाण त्याठिकाणी आले. त्यांनी त्या युवकास समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकाने माने तसेच चव्हाण यांना धक्काबुक्की करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच गाडीची तलवार काढा रे, बघतोच यांना,ह्ण असे म्हणत त्याने अन्य दोन युवकांच्या मदतीने माने व चव्हाण यांना रस्त्यावर पाडले. ही घटना समजताच क-हाड शहर पोलिस ठाण्यातील अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले. तर अन्य दोघे तेथून पसार झाले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हा