वाठार स्टेशन : सातारा-लोणंद या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात या राज्यमार्गावर अंबवडे गावानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती.सकाळी उशिरा रस्त्यावरील झाड काढण्याचे काम सुरू झाल्यावर दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. रविावरी या भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे या परिसरातील अनेक गावांतील छोटे-मोठे बंधारे भरले असून, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असली तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र सकाळपासून अवजड वाहतूक रखडली होती.रस्त्यावर पडलेले झाड काढेपर्यंत लोणंदकडे जाणारी वाहतूक व्यवस्था रेवडी, पळशी, देऊरमार्गे तसेच वडूथ, सातारारोड, देऊरमार्गे वळविण्यात आली होती.
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वडाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 16:11 IST
सातारा-लोणंद या सर्वाधिक रहदारीच्या रस्त्यावर रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात या राज्यमार्गावर अंबवडे गावानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती.
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वडाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
ठळक मुद्देसातारा-लोणंद राज्यमार्गावरील वडाचे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत