शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

साताऱ्यातील 'आर्यांग्ल' कडून ९ कल्पवृक्षांना जीवदान, २० वर्षांच्या झाडांचे केले प्रत्यारोपण

By प्रगती पाटील | Updated: May 6, 2024 19:04 IST

सातारा : वृक्षारोपण जितकं महत्त्वाचं आहे तितकच वृक्ष संवर्धनही गरजेचे आहे. याचा प्रत्यय आर्यांग्ल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिला. त्यांनी बांधकामात ...

सातारा : वृक्षारोपण जितकं महत्त्वाचं आहे तितकच वृक्ष संवर्धनही गरजेचे आहे. याचा प्रत्यय आर्यांग्ल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने दिला. त्यांनी बांधकामात अडथळा ठरणाऱ्या 9 कल्पवृक्षांचे प्रत्यारोपण करून त्यांना जीवदान दिले. त्याचबरोबर हॉस्पिटल परिसराच्या निसर्ग सौंदर्यात भर घातली.आयुर्वेद प्रसारक मंडळी संचलित आर्यांग्ल  हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम नियोजित आहे. या बांधकामात  १५ ते २० फूट उंचीची नारळाची नऊ झाडे अडथळा ठरत होती. त्यामुळे सुरुवातीला ती तोडण्याचा निर्णय झाला होता. तथापि 15 ते 20 वर्षांची ही झाडे तोडण्यापेक्षा जवळपास तेवढ्याच खर्चात हॉस्पिटलच्या आवारात त्यांचे प्रत्यारोपण करता येईल, असा पर्याय हरित सातारा ग्रुपने सुचवला. साताऱ्यातील वसंत पाटील असोसिएटचे संचालक, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दीपक पाटील यांनी या कामी पुढाकार घेत लगेच कार्यवाही सुरू केली. हॉस्पिटलच्या आवारातच कुंपणाच्या बाजूला खड्डे काढून एका दिवसात सर्व नऊच्या नऊ झाडांचे प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रक्रियेविषयी बोलताना दीपक पाटील म्हणाले, "झाडे नैसर्गिक सावली देतात. सिमेंटच्या इमारती थंड ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे ऊर्जेचा खर्च कमी होतो. झाडे हवेतील प्रदूषक फिल्टर करतात, त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारून निरोगी मानवी जीवनासाठी ती सहाय्यभूत होतात. एखाद्या झाडाचे संगोपन करून त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी 15 ते 20 वर्षांचा कालावधी जातो. प्रत्यारोपणामध्ये पूर्ण वाढ झालेलं झाडच लावले गेल्यामुळे वाया जाणारा कालावधी आपण वाचवू शकतो."

"पृथ्वीचे तापमान वाढते आहे. त्याची दाहकता आपण सर्व सातारकर आज अनुभवतो आहे. अशा परिस्थितीत वृक्ष प्रत्यारोपण करून त्याच्या संवर्धनाचा स्तुत्य व अनुकरणीय निर्णय आर्यांग्ल  हॉस्पिटल संचालक मंडळाने घेतला. झाडे लावण्याबरोबरच पूर्वीच्या झाडांचे व नव्याने लावलेले झाडांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे" - दीपक पाटील, संचालक, वसंत पाटील & असोसिएट 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर