शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:54 IST

सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्नेहा किसवे नव्या जिल्हा पुरवठा अधिकारी  भूसंपादन उपजिल्हाधिकारीपदी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती

सातारा : सातारा जिल्ह्यात भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पद अनेक महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर अखेर भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यांच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील व वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे तसेच वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, कऱ्हाडचे तहसीलदार राजेंद्र शेळके, खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या बदल्या झाल्या आहेत.शासनाने महसूल विभागातील प्रांताधिकारी (उपजिल्हाधिकारी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांची सांगलीच्या भूसंपादन क्र. ६ उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली. वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांची पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून बदली झाली. तर जिल्हा पुरवठा अधिकारीवसुंधरा बारवे यांची भूसंपादन क्र. १ उपजिल्हाधिकारी सांगली येथे बदली झाली आहे.सिडकोचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांची सातारा प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांची वाई प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पुणे येथील सहायक आयुक्त स्नेहा किसवे या आता जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत.दरम्यान, सातारा भूसंपादन क्र. ९ हे पद अनेक दिवसांपासून रिक्त होते. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारीच उपलब्ध झाला नव्हता. जिल्ह्यात सध्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध झाल्याने या विभागाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण यांची सातारा जिल्हा सहायक पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कऱ्हाडचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांची उजनी प्रकल्प तहसीलदार पुनर्वसन पदावर बदली झाली आहे. या जागी गडहिंग्लजचे तहसीलदार राजेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.माळशिरसच्या तहसीलदार बी. एस. माने यांची माण तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. हातकणंगलेच्या तहसीलदार वैशाली राजमाने यांची संजय गांधी योजनेच्या तहसीलदार (सातारा) पदी नियुक्ती झाली आहे.

वाईचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांची पुरंदरचे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी महाबळेश्वरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांची नियुक्ती झाली असून महाबळेश्वरचे तहसीलदार म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार मिनल कणसकर यांची नियुक्ती झाली.

संजय गांधी योजना (सातारा) तहसीलदार जयश्री आव्हाड यांची खटावच्या तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे. खटावचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची करमाळा तहसीलदार म्हणून बदली झाली.राजेश चव्हाण पुन्हा सातारा जिल्ह्यातसाताऱ्याचे तत्कालीन तहसीलदार राजेश चव्हाण हे तीन वर्षांपूर्वी गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे तहसीलदार म्हणून बदलून गेले होते. आता ते पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात बदलून आले असून कऱ्हाडचे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :TransferबदलीSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी