शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची बदली, सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओंची कार्यवाही  

By नितीन काळेल | Updated: June 16, 2023 19:08 IST

दोन वर्षांपासून रखडलेली प्रक्रिया

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या कर्मचारी बदलीचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला. यामुळे १८ जणांची बदली स्थानांतराने दुसऱ्या विभागात झाली आहे. तर काेरोनामुळे रखडलेली ही बदली प्रक्रिया दोन वर्षानंतर पार पडली आहे.याबाबत माहिती अशी की, मे महिन्यात जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी प्रशासकीय, आपसी आणि विनंती बदल्या झाल्या होत्या. कृषी, सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, प्राथमिक शिक्षण, बांधकाम आरोग्यसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ही प्रक्रिया होती. त्याचवेळी जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार का ?, मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार याबाबत चर्चा सुरू झाली होती.आता मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी एकाच विभागात पाच वर्षे ठाण मांडलेल्या १८ कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. कनिष्ठ सहायक ११ आणि वरिष्ठ सहायक ७ अशाप्रकारे या बदल्या केलेल्या आहेत. संबंधितांची स्थानांतराने जिल्हा परिषदेतच पण, दुसऱ्या विभागात बदली झालेली आहे. यामधील काहीजण या बदलीवर नाराज आहेत. पण, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा हा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागणार आहे.

यापूर्वी भागवत यांच्या काळात बदली...जिल्हा परिषदेतील एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली अडीच वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे संजय भागवत यांनी केली होती. तर याचदरम्यान, कोरोना संकट सुरू झाले. त्यानंतर संजय भागवत यांच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गाैडा हे आले. कोरोनामुळे त्यांच्या कार्यकाळात यामधील बदली प्रक्रिया पार पडली नव्हती. आता मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी १८ जणांची बदली केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदTransferबदली