शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:29 IST

रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.

ठळक मुद्देपुणे सीबीआयची कारवाई कागदपत्र परत देण्यासाठी स्वीकारले तीन हजार

सातारा : रेलरोकोमध्ये अटक केलेल्या संशयिताची कादपत्रे परत देण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरीक्षक एम. आय. बागवान याला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी बागवान याच्या कोल्हापुरातील घरावरही छापा टाकला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी, क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशन कार्यालयामध्ये उपनिरीक्षक एम. आय. बागवान हा गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेने रेलरोको केला होते. त्यावेळी बागवान याने आंदोलकांना अटक केली होती. संबंधित संशयितांकडून पॅनकार्डसह अन्य महत्त्वाची कागदपत्रे त्याने जप्त केली होती.

संबंधित तक्राराला जामिन मिळाल्यानंतर त्याने उपनिरीक्षक बागवान याला कादपत्रे परत करण्याची विनंतर केली. मात्र, बागवान याने त्याबदल्यात संबंधितांकडे तीन हजारांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने पुणे येथील सीबीआयच्या कार्यालयात जाऊन रितसर तक्रार दाखल केली.

त्यानुसार सीबीआयच्या टीमने बुधवारी सायंकाळी पाच वाजता क्षेत्र माहुली येथील रेल्वेच्या कार्यालयात बागवानला तीन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला तो राहत असलेल्या शासकीय वसाहतीमधील घरात नेले.

या ठिकाणीही झडती घेण्यात आली. बागवान हा मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कोल्हापुरातील घरातही अधिकाऱ्यांनी झडती घेतली. मात्र, काहीही सापडले नसल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर