शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये चक्काजाम, पुणे-पंढरपूर मार्गावरील वाहतूक खोळंबली; मराठा समाजाची आरक्षणाची मागणी

By दीपक शिंदे | Updated: September 4, 2023 15:56 IST

मलटण : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ व आरक्षण ...

मलटण : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ व आरक्षण मागणीसाठी आज, सोमवारी फलटणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील चौकात महाड पंढरपूर महामार्गावर चक्का जाम करण्यात आला. दरम्यान फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.आज सोमवार दि. ४ रोजी सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यानंतर शपथ घेऊन उपस्थित मराठा समाज बांधव क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पोहचले. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे; ‘अरे कोण म्हणते देत नाही; घेतल्याशिवाय राहत नाही’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा देत सर्वच राज्यकर्त्यांचा निषेध केला.वाहतूक ठप्प दरम्यान, पुणे- पंढरपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे तसेच पंढरपूर येथे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महाड पंढरपूर महामार्गावरील फलटणमधील नाना पाटील चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक व शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा