शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सलग सुट्ट्यांमुळे मलकापुरात महामार्गावर वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:24 IST

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली

मलकापूर : सलग सुट्ट्यांमुळे मलकापुरात महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची संख्या वाढल्यामुळे दोन्ही लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याने या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांसह महामार्गावर मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आलेली आहे. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. गुरुवारी सकाळपासून मलकापुरात सलग सुट्ट्या असल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली होती. सहापदरीकरणाच्या कामामुळे अगोदरच अरुंद रस्ता व त्यातच वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी दिवसभर होती. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलिस व कराड शहर पोलिस कर्मचारी प्रयत्न करत होते. तरीही महामार्गाच्या दोन्ही लेनवर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ही नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे. तर वाहनधारकाला आपला वेळ वाया घालविण्याशिवाय पर्यायच नाही.वाहतूककोंडीचा रुग्णवाहिकांना फटका..

सकाळपासूनच महामार्गावर विविध कारणाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महामार्गाच्या दोन्ही लेनवर तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना चांगलाच फटका बसला.