शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पुणे-बेंगळुरु महामार्गावर मलकापुरात वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:02 IST

पावसामुळे ठीक ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य, एसटी बस बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी

माणिक डोंगरे मलकापूर : एका बाजूला महामार्गाचे काम, दुसरीकडे पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य त्यातच आज, शुक्रवारी महामार्गावरच वाहने बंद पडल्यामुळे मलकापुरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांसह, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.                    मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू असून येथील युनिक उड्डाणपुलाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आलेली आहे. गेली तीन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे महामार्गाच्या दोन्ही लेनवर खड्ड्याचे सम्राज्य झाल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच मंडईजवळ बस बंद पडल्याने दिवसभर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस व कराड शहर पोलीस कर्मचारी प्रयत्न करत होते. एसटी महामंडळाकडून बस दुरुस्त करण्यासाठी किंवा ती रस्त्यावरून बाजूला घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात दिरंगाई केली जात होती. कोल्हापूर नाका, शास्त्रीनगर, शिवछावा चौक, मलकापूर फाटा ते नंदलापूर परिसरात दोन्ही लेनवर होणारी नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे. 'या' मार्गावरुन करा प्रवासवाहनधारकांनी पुण्यावरून येताना मसूर मार्गे कराड मलकापूर वरुण पुढे हायवेवर यावे. आणि कोल्हापूर वरून येताना मलकापूर मार्गे कराड मसूर असा प्रवास करावा. पाऊस असे पर्यंत या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन कराड शहर व मलकापूर वाहतूक पोलिसांनी केले आहे. एसटी बस बंद पडण्याचा सिलसिला कायमच गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर परिसरात एसटी महामंडळाच्या बस बंद पडण्याचा सिलसिला कायमच सुरू आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळी मलकापूरात कोल्हापूर-सातारा लेनवर बस अचानक महामार्गावरच बंद घडली आणि वाहतूक कोंडी झाली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडTrafficवाहतूक कोंडी