शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेवंडे घाटात दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 17:25 IST

साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

ठळक मुद्देरेवंडे घाटात दगड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्पलोकांना बारा किलोमीटरचा वळसा

शेंद्रे : साताऱ्याच्या पश्चिम भागात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरड पडण्याचे सत्र सुरूच आहे. सातारा तालुक्यातील रेवंडे घाटात गुरुवारी सकाळी मोठा दगड रस्त्यावर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.साताऱ्यांतून बोगद्यामार्गे जाणारा रस्ता रेवंडे भागात जातो. अलीकडच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून इथे घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. पश्चिम भागात यंदा झालेल्या संततधार पावसात वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास रेवंडेतून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या सोनार खिंडीत मोठा दगड कोसळून रस्त्यावर आला, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला.त्यातून साताऱ्यांकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अलीकडच्या काळात नव्याने झालेल्या घाटरस्त्यामुळे रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची सोय झाली आहे. घाट बंद झाल्यामुळे येथील लोकांना बारा किलोमीटरचा वळसा घालून राजापुरी, बोरणेमार्गे ठोसेघर रस्त्याने साताऱ्याला जावे लागणार आहे. रस्ता बंद झाल्यामुळे सर्वांना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर