शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दुचाकीस्वारांनी ट्राफिक इन्स्पेक्टरला उडविले!

By admin | Updated: May 27, 2016 22:21 IST

राजपथावर थरार : पोलिस अधिकारी सुरेश घाडगे जखमी; गाडीच्या नंबरप्लेटमुळे खात्याला चोरीचा संशय

सातारा : राजपथावरील एकेरी वाहतुकीतून भरधाव वेगात निघालेल्या मोटारसायकलस्वारांना अडविण्याचा प्रयत्न करताना दोन दुचाकीस्वारांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्या अंगावर गाडी घातली. यात घाडगे जखमी झाले असून, या दोघांना पकडण्यात वाहतूक शाखेच्या पोलिसांना अखेर यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी साताऱ्यातील मंगळवार पेठेतील पापाभाई पत्रेवाला चाळ परिसरात राहणाऱ्या आरबाज रज्जाक बागवान (वय २२) याच्यासह एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे.याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शहर वाहतूक विभागाच्या जीपमधून सहायक पोलिस निरीक्षक सुरेश घाडगे त्यांचे सहकारी प्रल्हाद गुजर व इतर टीम शहरातून फेरफटका मारत असताना राजलक्ष्मी टॉकीजजवळ आले. यावेळी राजपथावरून एकेरी वाहतूकीचा नियम मोडत मोती चौकाकडून भरधाव वेगात एक मोटारसायकल आली. हे पाहून घाडगे यांनी या दुचाकीस्वारांना हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र, या दुचाकीस्वारांनी किंचितही वेग कमी न करता आपली मोटारसायकल थेट घाडगे यांच्या अंगावर घातली. भर वेगातील या मोटारसायकलने उडविताच घाडगे जवळपास दहा ते बारा फूट लांब उडून पडले. हे पाहताच जीपमधील इतर सहकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यावर झेप घेतली. अन् या दोन दुचाकीस्वारांवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मोटारसायकलच्या धडकेत घाडगे यांचा हात मोडला असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून फ्रॅक्चर टाकण्यात आले. यानंतर अधिकाऱ्यावर हल्ला केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी या दोन तरुणांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. एकेरी वाहतुकीच्या काळात पोलिस मुख्यालयासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार विरुद्ध बाजूने जात असतात. अशीच परिस्थिती शहरातील इतर रस्त्यांवरही असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत वाहतूक कर्मचारी नियमन कमी आणि दिलेल्या कोट्यामुळे दंड संकलनामध्येच जास्त गुंतलेले असतात. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य वाहनधारक त्रासले आहेत. कोटा आणि दंड संकलन झाले की, इतर बाबींत गुंतणाऱ्या या वाहतूक कर्मचाऱ्यांमुळे साताऱ्यातील वाहतूक खऱ्या अर्थाने बेशिस्त झाली आहे. (प्रतिनिधी) राजपथावर एकेरी वाहतुकीचा नियम भंग करत हे दोन तरुण निघाले होते, म्हणून मी त्यांना ‘परत जा’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर गाडी घातली. माझ्या अंगावरील ड्रेस अन् बाजूची ट्राफिक खात्याची गाडी बघून तरी ते थांबतील, असे मला वाटले होते. मात्र, असा आततायीपणा घडेल, हे ध्यानीमनीही नव्हते. - सुरेश घाडगे, सहायक पोलिस निरीक्षकदुचाकी नेमकी कोणाची ?घाडगे यांना जखमी करणाऱ्या आरबाज रज्जाक बागवान व एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दुचाकीवर नंबरप्लेट नव्हती. ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होती.