शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात पर्यटकांना आधुनिक बोटिंगचा थरार अनुभवायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:27 IST

बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात ...

बामणोल : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात राज्य शासनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प स्कूबा डायव्हिंग उभारला जात असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुनावळे-वाघळी ता. जावळी या परिसरातील शिवसागर जलाशयाची बुधवारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकारी जयश्री भोज यांच्यासमवेत पाहणी केली. प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, जावळी तहसीलदार राजेंद्र पोळ, वन समितीचे किसन भोसले यावेळी उपस्थित होते.सध्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी कमालीची घटली असल्याने हे सर्व अधिकारी गुडघाभर चिखलातून वाट काढत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोटीतून नदीपात्रात जाऊन शिवसागर जलाशयातील पाणी पातळी व परिसराची त्यांनी पाहणी केली. स्कूबा डायव्हिंग प्रकल्प येथे उभारल्यावर पर्यटकांना आधुनिक बोटिंगचा थरार अनुभवायला मिळणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. भल्या सकाळी हा सर्व अधिकारी वर्ग मुनावळे येथे आला होता. येथील स्कूबा डायव्हिंग परिसराची पाहणी केल्यावर संबंधित सर्व खात्यातील अधिकाऱ्यांची दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण