शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

पर्यटनस्थळांना धोका दरडींचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:16 PM

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग ...

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम दिशेतून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे या परिसरात मुसळधार पाऊस पडतो. साहजिकच जागोजागी धबधबे, हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पावले तिकडे खेचली जातात. खास आकर्षण असलेल्या कास, बामणोली, भांबवली, ठोसेघर धबधब्याकडे जाणारे रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे फिरायला जाताना काळजी घेण्याची गरज आहे.महाबळेश्वर, नवजा, कोयना येथे दररोज सरासरी शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. विदर्भ, मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्यात वर्षभर पडत असेल तेवढा येथे एका दिवसात पडतो. वर्षा सहलीचा अनुभव घेण्यासाठी शेकडो पर्यटक पावसाळ्यात महाबळेश्वर, पाचगणीला येतात. येथे येण्यासाठी पसरणी किंवा आंबेनळी घाटातूनच जावे लागते. या घाटातही गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याने काही दिवसांत ती हटविली जात असल्याने रस्ता मोकळा होतो.वजराई धबधबा पर्यावरणप्रेमींचे प्राधान्याचे ठिकाण आहे. मार्गातही दरडी, रस्ता खचण्याचा धोका आहे. गेल्या आठवड्यात तर भांबवली धबधबा पाहायला गेलेले पुण्यातील काही पर्यटक दरड पडल्याने अडकले होते. त्यांचा मुक्काम व जेवणाची सोय ग्रामस्थांनी केली. दुसऱ्या दिवशी ते गावी गेले. सज्जनगड फाट्याच्या पुढील वळणावर रस्ता खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद आहे.पर्यटनस्थळी फिरायला जाताना घ्यावयाची काळजीपावसाळ्यात सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या परिसराची संपूर्ण माहिती अवगत करून घेणे.एखाद्या पर्यटनस्थळाला आपण प्रथमच भेट देणार असू तर फिरण्यासाठी तेथील मार्गदर्शकाची मदत घ्यावी.पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांच्या जवळ जाणे शक्यतो टाळावे.वाहत्या पाण्यात धोका पत्करून फोटोसेशन करण्याचा मोह आवरावा.पाऊस व धुके याचा अंदाज घेऊन वाहने सावकाश चालवावीत.पावसाळ्याच दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने घाटमार्गातून शक्यतो दिवसा प्रवास करावा.पावसामुळे डोंगर हिरवेगार झाले असून, अनेकजण डोंगरावर फिरण्यासाठी जातात. याठिकाणी जाण्यापूर्वी पायात चांगले रबरी बूट, अंगात रेनकोट परिधान करावा.पाणी आणि शेवाळे यांच्यामुळे दगड निसरडे झालेले असतात. त्यामुळे डोंगरदºयामध्ये भटकंती करताना विशेष काळजी घ्यावी.पावसाचे प्रमाण अधिक असल्यास फिरायला जाणे टाळावे.