शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: सडावाघापुरातील उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना मोजावे लागणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 12:15 IST

मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे

हणमंत यादवचाफळ: पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील सडावाघापूर येथील (रिव्हर्स वाँटर) उलटा धबधबा अल्पावधीच प्रसिध्द झाला आहे. येथील निसर्गरम्य वातावरण अन्  उलट्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या काही दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता याठिकाणी आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पैसे मोजावे लागणार आहेत.या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय सडावाघापूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता प्रत्येक माणसी वीस रुपये मोजावे लागणार आहेत.चाफळ विभागाच्या पश्चिमेला उंच डोंगर माथ्यावर निसर्गाने मुक्त उधळन केलेले सडावाघापूर पठार आहे. या पठारावरुन धबधबा कोसळतो. धबधब्याचे हेच पाणी पुन्हा उलट्या दिशेने येते असल्याने पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी याठिकाणी गर्दी करत आहेत. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे स्थानिकांनाही रोजगार निर्माण झाला आहे.पर्यटकांची वाढती गर्दी पाहता वनविभाग, सडावाघापूर ग्रामपंचायत व संयुक्त वनव्यवस्थापन समितीने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र या शुल्काबरोबर पर्यटकांना सुविधा देणेही गरजेचे असल्याचे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे.

धबधब्याकडे जाणाऱ्या  रस्त्याची ग्रामपंचायतीने व वनव्यवस्थापन समितीने डागडुजी केली आहे. मिळणाऱ्या कराच्या रक्कमेतुन या परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. यासाठी पर्यटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.धबधबा परिसराच्या विकासासाठी सरपंच अनिता बापू दंडिले व वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी कंबर कसली आहे.. पर्यटन शुल्क आकारुन या परिसराचा विकास करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. याची दोन दिवसापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पर्यटकही यासाठी सहकार्य करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटन