शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातून एकूण ६९ अर्ज, उमेदवारांची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:57 IST

सातारा जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये निवडणुका होत असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी सातारा तालुक्यातून सरपंच पदासाठी १०, तर सदस्य पदासाठी ५९ असे एकूण ६९ अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरले असल्याने मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.सातारा जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये निवडणुका होत असून, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी मान्याची वाडी येथून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सदस्य एक अर्ज, आसनगाव येथून सदस्य पदासाठी पाच, सरपंच पदासाठी एक अर्ज प्राप्त झाला. अपशिंगे येथे सदस्य पदासाठी एक व सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला. आंबेवाडी ग्रामपंचायतीतून सदस्य पदासाठी सहा, तर सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला.साबळेवाडीत सदस्य पदासाठी एक, म्हसवे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एक, मर्ढे येथे सदस्य एक अर्ज दाखल झाले आहेत. केळवली सांडवली सदस्य दोन अर्ज दाखल झाले आहेत. कामेरी येथून सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. आरळे येथे सदस्य पदासाठी दोन व सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला. करंजे तर्फ परळीत सदस्य पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत.राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण देगाव येथे सदस्य पदासाठी १६, तर सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले. काशीळ येथेही सदस्य पदासाठी १५ अर्ज दाखल झाले. वडूथला सरपंच पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. जैतापूरला सदस्य पदासाठी ४, सरपंच पदासाठी १ अर्ज, तर सोनगाव तर्फ सातारा येथे सदस्य पदासाठी एक व सरपंच एक अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज दाखल करण्याची मुदत दि. २ डिसेंबरला संपत आहे. यानंतर प्राप्त अर्जांची छाननी दि. ५, तर अर्ज मागे घेण्याची मुदत दि. ७ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. दि. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर मतमोजणी दि. २० रोजी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक