शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार!

By admin | Updated: September 11, 2015 23:25 IST

पतीदेखत कृत्य : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील धक्कादायक घटना; पाऊण तास धुमाकूळ

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर दहा ते बाराजणांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. एवढेच नव्हे तर घरात लुटालूट केल्यानंतर जाताना तीन दरोडेखोरांनी पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेमुळे पोलीस दल अक्षरश: हादरून गेले असून, दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा-कोरेगाव रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून एक दाम्पत्य २४ तास निगराणी करत आहे. त्या दाम्पत्याला तेथे छोटीशी झोपडी टाकून देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री १२ वाजता जेवण झाल्यानंतर ते दाम्पत्य झोपी गेले. दरम्यान, तीन वाजता दरवाजा ठोठावल्याचा त्यांना आवाज आला. त्यामुळे पतीने खिडकीतून बाहेर पाहिले असता सात ते आठ लोक होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, गज होते. ‘दरवाजा उघडा. घरात काय असेल ते द्या; अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणून काही दरोडेखोरांनी खिडकीच्या काचा फोडल्या. त्यानंतर खिडकीतून आत हात घालून त्यांनी कडी काढली. सहा ते सात दरोडेखोर घरात गेल्यानंतर पतीला चाकूचा धाक दाखवून एका जागेवर बसविले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच पतीच्या पँटच्या खिशातील दीड हजारांची रोकड दरोडेखोरांनी काढून घेतली. त्यानंतर पतीला जिवे मारण्याची धमकी देत तिघांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. हा प्रकार सुरू असताना दरोडेखोरांनी पतीच्या गळ्याला चाकू लावला होता. त्यामुळे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. पतीच्या डोळ्यांदेखत तिघांनी पत्नीवर अत्याचार केला. सुमारे पाऊण तास दरोडेखोरांनी त्यांच्या घरात धुमाकूळ घातला. जाताना त्यांनी पत्नीचा मोबाईल चोरून नेला. पहाटे उजाडल्यानंतर पीडित दाम्पत्याने संबंधित घरमालकाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. (प्रतिनिधी)कुत्र्यांमुळे एका ठिकाणी बेत फसलाया दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी त्या दरोडेखोरांनी तेथूनच जवळ असलेल्या एका घरावर दरोड्याचा बेत आखला होता; परंतु त्या ठिकाणी तीन-चार कुत्री होती. या कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केल्यामुळे दरोडेखोरांनी या दाम्पत्याच्या घराकडे मोर्चा वळविला अन् पहिल्या ठिकाणी प्रयत्न अयशस्वी झाला.दरोडेखोर बोलत होते तीन भाषासर्व दरोडेखोर २० ते २५ वयोगटांतील होते. आपापसांत ते हिंदी, मराठी आणि कन्नड भाषा बोलत होते. त्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून दरोडेखोरांचे स्केच बनविण्यात येणार आहेत.कृत्यानंतर कोल्ड्रिंक्सवर तावदरोडेखोरांनी हा घृणास्पद प्रकार केल्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमधील कोल्ड्रिंक्सवर ताव मारून त्यांनी सर्व बाटल्या रिकाम्या केल्या. तसेच जाताना त्यांनी हॉटेलमधील सिलिंडर, शेगडी, टिकाव, खोरे असे साहित्य चोरून नेले.दरोडेखोरांचे ठसे सापडले ! यावेळी दरोडेखोरांनी घरात सुमारे पाऊण तास धिंगाणा घातला. त्यामुळे भिंतीवर, तसेच दरवाजावर ठसे आहेत का, हे तपासण्यासाठी महिला ठसेतज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली. महिला ठसेतज्ज्ञांना काही ठिकाणी दरोडेखोरांचे ठसे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.