शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:20 IST

पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस बदलती वातावरणीय परिस्थिती, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत ...

ठळक मुद्देअपेक्षित दर नसतानाही केवळ दर वाढेल आशेवर टिकून

पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.

वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस बदलती वातावरणीय परिस्थिती, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून, ही परिसरातील शेतकरी टोमॅटोचे उच्चांकी उत्पादन घेत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात होणारा चढ-उतार यामुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनातून तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी परिसरातील शेतकºयांकडून टोमॅटोच्या बारमाही उत्पादनावर भर दिल्याचे दिसत आहे. यात वर्षभरात शेतकºयांकडून काही महिन्यांच्या फरकाने टोमॅटोची लागवड करून संपूर्ण वर्षभर माल बाजारात पाठविण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे बाजारातील अधूनमधून वाढणाºया वाढीव दरचा फायदा टोमॅटो उत्पादक शेतकºयाला होण्याची शक्यता असते.

शेतकºयांकडून केल्या जाणाºया बारमाही नियोजनातून काही अंशी फायदा मिळत असला तरी संबंधित पिकाचा भांडवली खर्च विचारात घेता शेतकºयांना बारमाही नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे. याशिवाय त्यातून अपेक्षित दर मिळून नफा मिळणेही अनिश्चितच आहे.प्रक्रिया उद्योगसाठी सहकार्य गरजेचे..पिंपोडे बुद्रुक येथील टोमॅटोवर प्रक्रिया करून चिप्स, सॉस व इतर काही पदार्थ तयार करण्यास शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करून मदत केल्यास शेतकºयांना निश्चितच याचा मोठा फायदाहोईल. 

दरातील चढ-उतारामुळे शेतकरी टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन करत असले तरी भांडवली खर्च जादा असल्याने एखाद्या वेळेस जादा दर मिळूनही निव्वळ नफा मिळणे अशक्य झाले आहे.-गणेश धुमाळ, चेअरमन, विकास सेवा सोसायटी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी