शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक पुस्तक दिन: ३५ दालनं अन् ४० हजार पुस्तकं; साताऱ्यानं महाराष्ट्राला दिलं ‘पुस्तकांचं गाव’!

By सचिन काकडे | Updated: April 23, 2025 15:38 IST

राज्य मराठी विकास संस्थेचा प्रत्येक जिल्ह्यात साकारणार उपक्रम

सचिन काकडेसातारा : वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी राज्यशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील ‘भिलार’ या गावात ‘पुस्तकांचं गाव’ ही अभिनव संकल्पना राबविली. असाच प्रयोग राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या माध्यमातून वाचनप्रेमींना साहित्य कलाकृतींचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे.वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, यादृष्टीने तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तकांचं गाव’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमासाठी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची निवड करण्यात आली. गावातील घरे, मंदिरे तसेच हॉटेलमध्ये पुस्तकांची स्वतंत्र दालने सुरू करून येथे बालसाहित्य, कथा, कादंबरी, कविता, मराठी भाषा व संस्कृती, नियतकालिके, कथा, लोकसाहित्य आदी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करण्यात आली. यानंतर ४ मे २०१७ साली भिलार हे गाव देशातील पहिलं ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून घोषित करण्यात आलं. स्थानिक नागरिकांसह महाबळेश्वर, पाचगणीला येणारे लाखो पर्यटक या गावाला भेट देऊन येथील साहित्यकृतींचा आनंद घेऊन वाचन संस्कृती जोपासण्याचे काम करत आहेत. हा उपक्रम आता एक-दाेन जिल्ह्यांपुरता मर्यादित न ठेवता व्यापक स्वरूपात राबविला जाणार आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून ‘पुस्तकांचं गाव’ साकारलं जाणार आहे.

३५ दालनं अन् ४० हजार पुस्तकंभिलारमध्ये पुस्तकांच्या दालनांची संख्या हळूहळू वाढत आहे. आजमितीला ३५ दालनांमध्ये विविध साहित्यकृतींची तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ४० हजारांहून अधिक पुस्तकांची मेजवानी वाचकांसाठी खुली करण्यात आली आहे.दोन युवती बनल्या फौजदार..भिलार गावात स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे दालनही सुरू करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दोन तरुणींनी येथे अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. या दोन्ही तरुणी मुंबई पोलिस दलात भरती झाल्या आहेत.

राज्य शासनाने भिलारच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पुस्तकांचं गाव’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी, ती मनामनांत रुजावी, हा या मागचा उद्देश आहे. - डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार