शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यात विद्यार्थ्यांसह गुरुजींवरही डोंगरं ओलांडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:57 IST

प्रवीण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : पाटण तालुक्यात दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११९ शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार आहे़ या शाळातील विद्यार्थ्यांचे नाव एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. यामुळे डोंगरदºयातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत़पाटण तालुका हा डोंगराळ असून, ...

प्रवीण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : पाटण तालुक्यात दहापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या ११९ शाळांच्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार आहे़ या शाळातील विद्यार्थ्यांचे नाव एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच्या शाळेत दाखल करण्यात येणार आहे. यामुळे डोंगरदºयातील शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या समोर अडचणी वाढल्या आहेत़पाटण तालुका हा डोंगराळ असून, त्याची भौगालिक रचना पाहता खूपच दुर्गम असा हा तालुका आहे़ या तालुक्यात डोंंगरदºयातील वाडी-वस्तीवर जीवनाचे शिक्षण देण्यासाठी पूर्वीच्या असणाºया जीवन शिक्षण विद्यामंदिरातून हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या पायावर उभे राहून गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे़. परंतु आताच्या जिल्हा परिषदेच्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी संख्या कमी असलेल्या प्राथामिक शाळांचे समायोजन करण्याचा शासनाच्या निर्णयामुळे दुर्गम असणाºया तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे़ यामुळे तालुक्यातील ११९ शाळांमधून शिक्षण घेणाºया ८२१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात सापडले आहे़तालुक्यातील ११९ शाळांपैकी काळेवाडी (आडूळ), डाकेवाडी (मत्रेवाडी), महाडिकवाडी (तारळे) याबरोबरच पुनर्वसन झालेल्या घोटील शाळा क्रमांक दोन या चार शाळांची माहिती शासनाने परत मागविली आहे़ या चार शाळांचे गुगल मॅपद्वारे दोन शाळांमधील अंतराबरोबरच दोन शाळांमधील नैसर्गिक अडथळा आहे का? या व्यतिरिक्त दुसरी कोणती अडचण आहे का? याबाबत शासनाने अहवाल मागविला असून, त्यांनतरच या शाळा समायोजनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे़पाटण तालुक्यात झेडपीच्या एकूण ५३२ शाळा असून, त्यापैकी ११९ शाळांचे समायोजन हे एक किलोमीटर अंतर असणाºया जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे़; परंतु पाटण तालुक्याची भौगोलिक रचना पाहता दोन शाळांमधील अंतर हे एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे़ या ११९ शाळांचे समायोजन केले तर या डोंगरदºयातील ११९ जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेणाºया ८२१ विद्यार्थी- विद्यार्थिंनी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़

टॅग्स :educationशैक्षणिक