शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘वाघ’वस्तीतल्या बछड्याची उत्तुंग भरारी

By admin | Updated: May 11, 2016 23:56 IST

तुषार वाघ : पहिल्या प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षेत घवघवीत यश

सातारा : लहानपणी वस्तीत खेळून मराठी माध्यमातून शिक्षण घेणारा... पुढे हुशार म्हणून अभियांत्रिकीकडे वळलेला... नंतर प्रयत्न म्हणून स्पर्धा परीक्षा देऊन तहसीलदार पदावर विराजमान झालेला... आणि आत्ता तर चक्क पहिल्या प्रयत्नातच ‘युपीएससी’त यश मिळविणारा तुषार मोहन वाघ! खटाव तालुक्यातील वाघवस्तीतील या अवघ्या चोवीस वर्षांच्या बछड्याने ग्रामीण भागातही खूप टॅलेंट असल्याचे सिद्ध केले आहे.खटाव तालुक्यातील वाघवस्तीत माध्यमिक शिक्षकाच्या घरात जन्मलेला तुषार पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थी होता. मात्र, अभ्यासाबरोबरच त्याचा सामाजिक जाणिवांचा आवाका मोठा होता. मराठी माध्यमातून ९२ टक्के मिळवून दहावी झाल्यानंतर त्याने विज्ञान शाखेची निवड केली. त्यानंतर अभियांत्रिकी शाखेकडे जाण्यासाठी त्याने पुणे गाठले. कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तो करिअरच्या नवनवीन संधी शोधत होता. आपण स्पर्धा परीक्षा देऊ असा निश्चय त्याने केला. अभियांत्रिकी पदवी मिळाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तो ‘एमपीएससी’ उत्तीर्ण झाला. त्यातून त्याची शेवगाव, ता. अहमदनगर येथे प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. शासन सेवेत कार्यरत असताना आलेल्या अनुभवातून त्याने ‘युपीएससी’ करण्याचा निश्चय केला. जिद्दी आणि चिकाटीला मिळालेली बुद्धीची जोड यामुळेच तुषारने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. हे यश मिळविणारा तो पहिला खटाववासीय झाला आहे. आपल्या यशाचे श्रेय तो कुटुंबीयांच्या पाठिंब्याला देतो. (प्रतिनिधी) आपल्याकडे अजूनही महिला आणि बालकांच्या आरोग्याविषयी पुरेशी जनजागृती नाही. युपीएससीच्या माध्यमातून मिळालेल्या पदावरून मला या विषयात काम करायला आवडेल. याबरोबरच ग्रामीण भागात उघडपणे आणि शहरात दडून असणाऱ्या जात व्यवस्थेवरही काम करण्याची इच्छा आहे. आपल्या भागात निर्मल भारतच्या माध्यमातून क्रांतीकारक बदल घडविण्याचाही कायम प्रयत्न असणार आहे.- तुषार वाघ, वाघवस्ती, खटावघरातील चारही मुलांची अतिउच्च ध्येयप्राप्तीवाघवस्ती (वरूड) ता. खटाव येथील तुकाराम व पारूबाई वाघ यांना मोहन आणि मच्छिंद्र ही दोन मुले. यातील मोहन हे माध्यमिक शिक्षक तर मच्छिंद्र प्रगतशील शेतकरी. मोहन यांची पत्नी मालन यांनी लग्नानंतर बी.ए. बी. एड. चे शिक्षण पूर्ण केले. मात्र, घरातील पाच मुलांसाठी त्यांनी कुठेही नोकरी स्वीकारली नाही. मोहन यांना रेश्मा, सुषमा आणि तुषार ही तीन मुले तर मच्छिंद्र यांना नीलिमा आणि मंदार ही दोन मुले. यातील रेश्मा एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट आॅफिसर आहे, तर सुषमा प्राध्यापक आहे. तुषार पहिल्या प्रयत्नात ‘युपीएससी’त झळकला तर नीलिमाची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत निवड झाली आहे. पुढील महिन्यात तिला नियुक्त पत्र मिळणार आहे. मंदार पुण्यात शिक्षण घेत आहे. कुटुंबीयांचे संस्कार आणि मुलांचे कष्ट यामुळे वाघवस्तीतील ही चारही मुलं उच्च ध्येयापर्यंत पोहोचली.