शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

ढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात जिल्ह्यात मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 13:27 IST

सातारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देढगांचा गडगडाट अन् विजांच्या कडकडाटात जिल्ह्यात मुसळधारअनेक ठिकाणी हजेरी : वादळामुळे वीजपुरवठा खंडित; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सातारा : जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाची उघडीप होती. पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली भागात अत्यल्प पाऊस व्हायचा. तर दुष्काळी भागात पावसाची उघडीप होती. मात्र, रविवारी सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस होणार अशी चिन्हे दिसत होती. सायंकाळनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पावसास सुरूवात झाली.साताऱ्यात रविवारी रात्रीच्या सुमारास विजांच्या झगमगटातात आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील विजपुरवठाही काहीकाळ खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.कऱ्हाड तालुक्यातही मुसळधार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. तर ऊस भुईसपाट झाला. माण तालुक्यातील म्हसवडसह दहिवडी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे विजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.खंडाळा तालुक्यातील शिरवळलाही रविवारी रात्रीच्या सुमारास पावसाने झोडपून काढले. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. महाबळेश्वर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरात सुमारे दीड तास ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा बंद झाला होता.खटावमध्येही एक तास मुसळधार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटात हा पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वडूज परिसरातही मुसळधार पाऊस झाला. कोरेगावसह तालुक्यात अनेक ठिकाणी वादळासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातही पुन्हा जोरदार पाऊस झाला. तर सातारा शहराच्या पश्चिम भागातील कास परिसरात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तसेच सातारा शहराजवळील शेंद्रे परिसरातही वादळासह जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.कोयना धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा...पश्चिम भागात अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक कमीच होत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १०२.९८ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. तर सकाळपर्यंत कोयनेला १२, नवजा येथे १५ आणि महाबळेश्वर येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर