तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:08 AM2018-02-08T01:08:48+5:302018-02-08T01:10:44+5:30

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला.

Three-wheelers should be locked for the first time in the Satara area. | तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

तीनचाकींना प्रथमच सातारा परिसरात जॅमर ‘लॉक किया जाए’

Next

सातारा : शहरात गेल्या काही दिवसांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया वाहनांना कारवाईचा बडगा उचलला. सोमवारी पोवई नाका परिसरात उभ्या असलेल्या चक्क रिक्षालाच जॅमर बसवला.

सातारा शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: राजवाडा, मोती चौक, खणआळी, राजपथ, पोवई नाका, एसटी स्टँड व भूविकास बँक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. अनेकजण रस्त्यावर वाहने पार्क करून जात असतात. त्यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणाºया दुचाकी उचलल्या जातात. तसेच चारचाकी वाहनांना जॅमर बसवला जात होता.

शहरात सर्वच परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र थांबे आहेत. तरीदेखील रिक्षाचालक रस्त्यावर कुठेही रिक्षा थांबून उभे असतात. रस्त्याच्याकडे रिक्षा न लावता रस्त्याच्या मध्येच ती उभी केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. अशाप्रकारे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली होती. रिक्षाचालकांच्या आडमुठी धोरणामुळे अनेक रस्त्यावर इतर वाहनचालकांसोबत त्यांची ‘तुतू मैमै’ होत असते. अशात अपघाताच्या घटनांमध्ये वाढत होते असते.
वाहतूक शाखेचे पोलिस त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्ष केले जात होते.

दरम्यान, सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाºया रिक्षांच जॅमर बसवण्याची भूमिका घेतली. दोन दिवसांत साधारण राजवाडा, पोवई नाका, एसटी स्टँड परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाºया १० रिक्षांना अशाप्रकारे जॅमर बसवले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रिक्षा चालकांना झटका दिल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

अपघाताचा धोका
सातारा शहरात मोती ते शनिवार पेठ, पोवई नाका ते एसटी स्टँड, पोवई नाका ते जिल्हा परिषद, समर्थ मंदिर ते राजवाडा, माची पेठ ते शाहू चौक आदी उताराच्या ठिकाणी रिक्षाचालक रिक्षा न्युट्रल करून मुंगी पावलाने प्रवाशांची वाट पाहत बसलेले असतात.

वाहतूक पोलिसदेखील रिक्षामध्ये चालक असल्याने कारवाई करत नाही. मात्र, याच रिक्षा वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यांना रोखण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अशा प्रकारे रिक्षा रस्त्यांमध्ये उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Three-wheelers should be locked for the first time in the Satara area.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.